Chhava News

को. ए.सो. सोसायटी शाळेचे CEO विनायक खोपकर यांचा मॉर्निंग वॉक ग्रुपतर्फे सत्कार

सचिन मयेकर | ९ ऑगस्ट — छावा डिजिटल न्यूज मीडिया को. ए. सो. सोसायटी शाळेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) श्री. विनायक खोपकर हे सेवानिवृत्त झाल्यानिमित्त त्यांच्या प्रदीर्घ सेवाकार्याचा गौरव करत मॉर्निंग वॉक ग्रुपतर्फे विशेष सत्कार करण्यात आला. श्री. विनायक खोपकर यांनी आपल्या सेवाकाळात शैक्षणिक क्षेत्रात जबाबदारीने व प्रामाणिकपणे योगदान दिले. त्यांच्या सेवानिवृत्तीच्या निमित्ताने मॉर्निंग वॉक…

Loading

Read More

सलमान खानच्या ‘गॅलेक्सी’बाहेर कर्तव्य बजावताना पोलिसाचा मृत्यू.. ४१ वर्षीय कॉन्स्टेबल गणेश रायते यांना अचानक हृदयविकाराचा झटका सुरक्षेच्या ड्युटीवर असतानाच कोसळले

सचिन मयेकर | ८ ऑगस्ट — छावा डिजिटल न्यूज मीडिया बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या वांद्रे येथील ‘गॅलेक्सी अपार्टमेंट’बाहेर सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलीस कॉन्स्टेबलचा कर्तव्यावर असतानाच दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. गणेश रायते (वय ४१) असे मृत्यू झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. ते मुंबई पोलिसांच्या LA-4 तुकडीत कार्यरत होते. ड्युटीवर असतानाच अचानक कोसळले मिळालेल्या माहितीनुसार,…

Loading

Read More

स्वप्न अंतराळाचं, ध्येय इस्त्रोचं श्रावणीच्या स्वप्नांना मिळाली नवी दिशा आयआयईएसटी शिबपूरमध्ये एरोस्पेस इंजिनिअरिंगला प्रवेश

सचिन मयेकर | ७ ऑगस्ट — छावा डिजिटल न्यूज मीडिया आकाशात दिसणाऱ्या चंद्र-ताऱ्यांकडे केवळ कुतूहलाने पाहणाऱ्या एका चिमुकल्या मुलीने तेव्हाच मनाशी एक स्वप्न घट्ट बांधलं होतं… ‌‘एक दिवस मला याच अंतराळात काम करायचंय!‌’ त्या स्वप्नाला अभ्यासाची शिस्त, मेहनतीची जोड आणि आई-वडिलांच्या भक्कम पाठिंब्याची साथ मिळाली. रायगडच्या शैक्षणिक क्षेत्रात आपल्या गुणवत्तेची छाप उमटवणारी अलिबाग तालुक्यातील पंतनगरची…

Loading

Read More

सायबर फसवणुकीसाठी ‘म्युल’ बँक खाते पुरवल्याचा आरोप रेवदंड्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

सचिन मयेकर | ६ ऑगस्ट — छावा डिजिटल न्यूज मीडिया सायबर गुन्हेगारांना कमिशनच्या मोबदल्यात स्वतःचे बँक खाते वापरण्यास देणे एका महिलेस चांगलेच महागात पडले आहे. सायबर फसवणुकीत वापरासाठी ‘म्युल’ बँक खाते उपलब्ध करून दिल्याप्रकरणी रेवदंडा पोलिसांनी एका महिलेसह अन्य एका संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला असून या कारवाईमुळे सायबर गुन्ह्यांविरोधातील पोलिसांची मोहीम अधिक तीव्र झाल्याचे दिसून…

Loading

Read More

संपादकीय | ५१०० रुपये पाठवले… पण चार खांदे द्यायलाही वेळ नव्हता! वृद्धाश्रमात बापाचा अंत… लेकींनी VIDEO कॉलवर पाहिले अंत्यसंस्कार; समाजाला अंतर्मुख करणारी हृदयद्रावक घटना

सचिन मयेकर | ६ ऑगस्ट — छावा डिजिटल न्यूज मीडिया “बाबा, मी येते…” या एका वाक्याची वाट पाहत एका वृद्ध पित्याने अखेरचा श्वास घेतला. पण तो क्षण कधीच आला नाही. आयुष्यभर आपल्या तिन्ही लेकींना शिक्षण, संस्कार आणि सक्षम भविष्य देणाऱ्या शिवचरण रतन गुप्ता यांचा शेवट वृद्धाश्रमात झाला. त्यांच्या डोळ्यांसमोर ना लेकी होत्या, ना नातवंडं, ना…

Loading

Read More

मनसेच्या लढ्याला मोठे यश अखेर खारेपाटकरांना दिलासा अलिबाग–मांडवा मार्गे शिरवली एसटी पुन्हा धावली

सचिन मयेकर | ४ ऑगस्ट — छावा डिजिटल न्यूज मीडिया खारेपाट विभागातील हजारो प्रवाशांच्या न्याय्य मागणीला अखेर यश आले असून, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर अलिबाग–मांडवा मार्गे शिरवली एसटी बससेवा पुन्हा सुरू करण्यात आली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून बससेवा बंद असल्याने महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि नोकरदार वर्गाचे प्रचंड हाल होत होते. अखेर एसटी प्रशासनाने…

Loading

Read More

प्रसूतीच्या निर्णायक क्षणी डॉक्टर गैरहजर नवजात बालकाच्या मृत्यूप्रकरणी अलिबाग जिल्हा रुग्णालयातील डॉ. प्रियल शेंडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल

जे.जे. रुग्णालयाच्या तज्ज्ञ समितीच्या अहवालानंतर कारवाई; ड्युटीवरील अनुपस्थितीचा ठपका. सचिन मयेकर  | २ ऑगस्ट — छावा डिजिटल न्यूज मीडिया चार वर्षांपूर्वी अलिबाग जिल्हा रुग्णालयात घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेत नवजात बालकाचा मृत्यू झाल्याप्रकरणी अखेर मोठी कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. सर जे.जे. समूह रुग्णालय, मुंबई येथील पाच तज्ज्ञ डॉक्टरांच्या समितीने सादर केलेल्या अहवालाच्या आधारे तत्कालीन ऑन-ड्युटी…

Loading

Read More

रणांगण दणाणलं… अखेरचा श्वासही भारतमातेच्या नावाने!  गनमास्टर शहीद निलेश तुणतुणे : कारगिलच्या रणभूमीवर अमर झालेला रायगडचा वीर

छावा’ मराठी डिजिटल न्यूज पोर्टल तर्फे भारतमातेच्या अमर सुपुत्राला विनम्र अभिवादन सचिन मयेकर |१ ऑगस्ट — छावा डिजिटल न्यूज मीडिया आज १ ऑगस्ट… रायगडच्या मातीतला एक दिवस असा, ज्यादिवशी प्रत्येक भारतीयाचे डोळे ओलावतात आणि छाती अभिमानाने फुलते. कारण आज आहे कारगिल युद्धातील रायगडचा शूर सुपुत्र, गनमास्टर शहीद निलेश नारायण तुणतुणे यांचा २८ वा स्मृतिदिन. वर्षे सरतात,…

Loading

Read More

वरसोलीत अमली पदार्थांचा मोठा साठा जप्त बिहारच्या इसमाला बेड्या पोलिसांची धडाकेबाज कारवाई

सचिन मयेकर | छावा डिजिटल न्यूज मीडिया | वरसोली  अलिबाग तालुक्यात अमली पदार्थांच्या विळख्याला मोठा धक्का देत अलिबाग पोलिसांनी वरसोली परिसरात धाडसी कारवाई करून तब्बल ३ लाख १८ हजार १०० रुपयांचा गांजा व हेरॉईनचा साठा जप्त केला आहे. या कारवाईत बिहार राज्यातील एका ४६ वर्षीय संशयिताला अटक करण्यात आली असून, अमली पदार्थांच्या पुरवठ्यामागे मोठे रॅकेट…

Loading

Read More

सुमारे ४0 वर्षांची पाण्याची टाकी धोकादायक अवस्थेत कधीही कोसळण्याची भीती रेवदंडा ग्रामपंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना तातडीच्या कारवाईचे पत्र

सचिन मयेकर | छावा डिजिटल न्यूज मीडिया | रेवदंडा  रेवदंडा येथील मारुती आळी परिसरातील सुमारे ४0 ते ४५ वर्षांपूर्वी बांधण्यात आलेली उमटे प्रादेशिक ग्रामीण पाणीपुरवठा योजनेची उंच पाण्याची टाकी अत्यंत धोकादायक अवस्थेत पोहोचली असून ती कधीही कोसळून मोठी जीवित व वित्तहानी होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर ग्रुप ग्रामपंचायत रेवदंडाने रायगड जिल्हा परिषदेचे…

Loading

Read More