डीजेच्या गजरात भव्य मिरवणूक पंचशील नगर ते पारनाका जयभीममय

छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल, रेवदंडा १४ एप्रिल २०२६

          सचिन मयेकर           

रेवदंडा प्रतिनिधी. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त रेवदंडा येथील पंचशील नगर येथून पारनाका पर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात आली. संपूर्ण परिसर जय भीमच्या घोषणांनी आणि उत्साहाने दुमदुमून गेला होता.

संध्याकाळी सुमारे 7 नंतर सुरू झालेल्या या मिरवणुकीत डीजेच्या गजरात युवकांचा उत्साह ओसंडून वाहत होता. बाबासाहेबांच्या गीतांच्या तालावर महिला व तरुण मोठ्या उत्साहात थिरकत होते. मिरवणुकीदरम्यान आकाशात फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली, ज्यामुळे वातावरण आणखी रंगतदार झाले.

या मिरवणुकीत समाजातील विविध घटकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. जय भीमच्या घोषणांनी पंचशील नगर ते पारनाका हा संपूर्ण मार्ग भारावून गेला होता. ठिकठिकाणी नागरिकांनी मिरवणुकीचे स्वागत करत बाबासाहेबांना अभिवादन केले.

नितीन गायकवाड, मधुकर गायकवाड, सचिन पवार, निलेश गाडे, शांताबाई गायकवाड, विलास धाटावकर, रमेश धाटावकर, अमोल गायकवाड, आर्यन पवार, प्रवीण पवार, वरद धाटावकर, नयन गायकवाड, रितिक पवार, शुभम जाधव, सागर गायकवाड, निहाल गायकवाड, मंगेश गायकवाड, रोशन सकपाळ, जीवन जाधव, गणेश गायकवाड, गौरव गायकवाड, प्रकाश जाधव, दत्तात्रेय गायकवाड आदींच्या उत्स्फूर्त सहभागामुळे मिरवणूक भव्य स्वरूपात पार पडली.

मिरवणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी रेवदंडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भैरू जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली राठोड, गव्हाणे, पाटील आदी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *