काशीद समुद्रकिनारी मृत्यूच्या दाढेतून पती-पत्नीला खेचून आणणाऱ्या रायगड पोलिसांचा सन्मान
छावा डिजिटल न्यूज पोर्टल राजेश बाष्टे अलिबाग दि. २३ मे २०२६
महाराष्ट्र पोलीस दलातील कर्तव्यदक्ष आणि धाडसी पोलीस अंमलदारांनी काशीद समुद्रकिनारी समुद्राच्या प्रचंड प्रवाहात वाहून जाऊन बुडण्याच्या स्थितीत असलेल्या पती-पत्नीचे प्राण वाचवत मानवतेचे अनोखे उदाहरण घालून दिले.या थरारक घटनेत प्रसंगावधान, तत्परता आणि कौशल्य दाखवत दोन्ही पोलीस अंमलदारांनी जीवाची पर्वा न करता समुद्रात उतरून त्या दाम्पत्याला सुरक्षित बाहेर काढले. त्यांच्या या शौर्यपूर्ण कार्याची दखल घेत ऑचल दलाल यांनी संबंधित दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांना प्रशस्तीपत्र प्रदान करून गौरव केला.रायगड पोलीस दलाच्या या धाडसी कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत असून, संकटसमयी पोलिसांनी दाखविलेली तत्परता नागरिकांसाठी दिलासादायक ठरत आहे.कर्तव्य, धाडस आणि मानवता… रायगड पोलिसांचा सलाम.
![]()

