खवळलेल्या समुद्राचा परिणाम रेवदंडा किनाऱ्यावर समुद्रातील सिग्नल वाहून आला चिखलाच्या मोठ्या गोळ्यांनी किनारा भरला

सचिन मयेकर |रेवदंडा —छावा डिजिटल न्यूज ०६ जून २0२६
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आणि खवळलेल्या समुद्रामुळे रेवदंडा समुद्रकिनाऱ्यावर मोठे बदल दिसून येत आहेत. समुद्रात खोल पाण्यात जहाजे व मासेमारी नौकांना मार्गदर्शन करण्यासाठी बसविण्यात आलेला सागरी सिग्नल (मार्कर बॉय) लाटांच्या प्रचंड तडाख्यामुळे आपल्या जागेवरून वाहत येऊन थेट किनाऱ्यावर अडकला आहे. याशिवाय समुद्राने मोठ्या प्रमाणात गाळ, चिखल अनेक ठिकाणी चिखलाचे मोठमोठे गोळे साचले आहेत. त्यामुळे रेवदंडा समुद्रकिनाऱ्याचे सौंदर्य मलिन झाले असून किनाऱ्यावर फिरणाऱ्या नागरिकांना व पर्यटकांनाही अडचणींचा सामना करावा लागत आहे. स्थानिकांच्या मते, अशा प्रकारे सागरी सिग्नल किनाऱ्यावर वाहून येणे ही दुर्मीळ घटना असून संबंधित सागरी विभागाने या सिग्नलची पाहणी करून तो पुन्हा मूळ ठिकाणी बसविण्याची आवश्यकता आहे. समुद्रातील हा सागरी सिग्नल (Buoy/मार्कर बॉय) जहाजे, बोटी आणि मच्छीमारांना सुरक्षित मार्ग दाखवण्यासाठी बसविला जातो. भरती-ओहोटी, खडकाळ भाग, उथळ पाणी, नौकानयनाचा मार्ग किंवा धोकादायक क्षेत्र यांची माहिती या सिग्नलद्वारे मिळते. रात्री त्यावरील दिव्यामुळे दूरवरूनही तो दिसतो आणि नौकांना योग्य दिशा मिळण्यास मदत होते.
![]()

