छावा सलाम खाकीला  खांद्यावर उचलून दिला जीवाला आधार… खाकी पुन्हा ठरली देवदूत

पूराच्या पाण्यात अडकलेल्या एसटीतील ८ प्रवाशांना रायगड पोलिसांनी दिले जीवदान

सचिन मयेकर |रेवदंडा —छावा डिजिटल न्यूज ०५ जून २0२६

रायगड जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर रसायनी पोलिसांनी दाखवलेले धाडस, कर्तव्यनिष्ठा आणि माणुसकीचे दर्शन संपूर्ण जिल्ह्यासाठी प्रेरणादायी ठरले आहे. सारसई येथील कर्जत–पेण मार्गावर पुराच्या पाण्यात एक एसटी बस अडकली होती. बसमधील आठ प्रवाशांचे प्राण धोक्यात आले असताना रसायनी पोलिसांनी हेल्प फाउंडेशन, रसायनी यांच्या सहकार्याने तातडीने बचावमोहीम राबवून सर्व प्रवाशांची सुखरूप सुटका केली. या बचावकार्यातील सर्वात हृदयस्पर्शी क्षण म्हणजे ७२ वर्षीय ज्येष्ठ महिलेला एका पोलीस कर्मचाऱ्याने स्वतःच्या खांद्यावर घेऊन सुरक्षित स्थळी पोहोचवले. संकटसमयी कर्तव्याबरोबरच मानवतेची जपणूक करणाऱ्या या कृतीने उपस्थित नागरिकांच्या डोळ्यांत कौतुकासह आदर दाटून आला. रसायनी पोलिसांच्या तत्परता, धाडस आणि सेवाभावी वृत्तीमुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळली. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल नागरिकांनी पोलिसांचे मनापासून अभिनंदन केले असून, अतिवृष्टीच्या काळात प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. खाकीचा खरा धर्म म्हणजे जनसेवा… आणि संकटात धावून जाणे हीच तिची खरी ओळख.

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *