आज सागमळ्यात विद्यार्थ्यांसाठी भव्य करिअर मार्गदर्शन शिबीर  “छोटम शेठ” दिलीप भोईर यांच्या सामाजिक उपक्रमांची पुन्हा जोरदार चर्चा

श्री. दिलीप (छोटम) विठ्ठल भोईर चॅरिटेबल ट्रस्ट-झिराड व उत्कर्ष फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “उत्कर्ष फाउंडेशन करिअर मार्गदर्शन चौल” हा महत्त्वपूर्ण उपक्रम शनिवार दि. २३ मे २०२६ रोजी सकाळी १० ते १२.३० वाजेपर्यंत पाठारे क्षत्रिय समाज हॉल, चौल-सागमळा येथे पार पडणार आहे. अलिबाग तालुका व चौल जिल्हा परिषद क्षेत्रातील इयत्ता १० वी व १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना करिअरच्या विविध संधींबाबत मार्गदर्शन मिळावे, योग्य दिशा मिळावी आणि ग्रामीण विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रेरणा निर्माण व्हावी या उद्देशाने या विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात अनुभवी मार्गदर्शक, तज्ञ टीम तसेच विविध मान्यवर उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार असून उपस्थित विद्यार्थ्यांना आकर्षक भेटवस्तूंचे वितरणही करण्यात येणार आहे.

छावा डिजिटल न्यूज पोर्टल सचिन मयेकर | रेवदंडा दि. २३ मे २०२६

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना योग्य दिशा मिळावी, शिक्षणासाठी संघर्ष करणाऱ्या मुलांना आधार मिळावा आणि युवकांनी मोठी स्वप्ने पाहावीत या उद्देशाने झिराड परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून विविध सामाजिक उपक्रम राबवणारे श्री. दिलीप उर्फ “छोटम शेठ” विठ्ठल भोईर पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. आज शनिवार दि. २३ मे रोजी सागमळा येथे होणाऱ्या भव्य करिअर मार्गदर्शन शिबिरामुळे संपूर्ण चौल जिल्हा परिषद क्षेत्रात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. श्री. दिलीप (छोटम) विठ्ठल भोईर चॅरिटेबल ट्रस्ट-झिराड आणि उत्कर्ष फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा विशेष उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.

ग्रामीण विद्यार्थ्यांना शिक्षणाची नवी दिशा

ग्रामीण भागात अनेक विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी दररोज लांब अंतर चालावे लागते. अनेक पालक आर्थिक अडचणींमुळे मुलांना योग्य सुविधा देऊ शकत नाहीत. ही परिस्थिती लक्षात घेऊन “छोटम शेठ” यांनी विद्यार्थ्यांसाठी मोफत सायकल वाटपाचा मोठा उपक्रम राबवला होता. या उपक्रमामुळे अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मोठा आधार मिळाला.मुलांच्या सुरक्षित प्रवासासाठी मिनीडोअर सुविधा. फक्त सायकल वाटपावर न थांबता काही दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी मिनीडोअर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. ग्रामीण भागातील पालकांसाठी हा उपक्रम मोठा दिलासा ठरला. विद्यार्थ्यांच्या शिक्षणात प्रवास अडथळा ठरू नये, यासाठी केलेला हा प्रयत्न परिसरात कौतुकाचा विषय ठरला होता.करिअर मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना मोठे स्वप्न पाहण्याची प्रेरणा १० वी आणि १२ वी नंतर पुढे काय? कोणत्या क्षेत्रात संधी आहेत? सरकारी नोकरी, स्पर्धा परीक्षा, तांत्रिक शिक्षण, व्यवसाय, आधुनिक कोर्सेस याबाबत ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये मोठा संभ्रम असतो. त्यामुळे आज आयोजित करण्यात आलेल्या करिअर मार्गदर्शन शिबिरात अनुभवी मार्गदर्शक विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती देणार आहेत. या शिबिरात विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्याची संधी, तज्ञांचे मार्गदर्शन आणि आकर्षक भेटवस्तूंचे वितरणही होणार असल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे.झिराड परिसरात भोईर कुटुंबाचा सामाजिक व राजकीय सहभाग सलगपणे दिसून येतो. ग्रामपातळीवरील प्रश्न, युवकांचे विषय, शैक्षणिक उपक्रम आणि सामाजिक कार्यक्रमांमध्ये कुटुंब सक्रिय असल्याने स्थानिक पातळीवर त्यांचा प्रभाव अधिक मजबूत झाल्याची चर्चा आहे. रायगड जिल्हा परिषदेत समाजकल्याण सभापती म्हणून काम करताना ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे प्रश्न, युवकांचे मार्गदर्शन आणि सामाजिक विषयांवर त्यांनी भर दिला. गेली अनेक वर्षे स्थानिक पातळीवर जनसंपर्क टिकवून ठेवत त्यांनी स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.

आजच्या शिबिराकडे संपूर्ण परिसराचे लक्ष.

सागमळा येथे आज सकाळी होणाऱ्या या शिबिराला विद्यार्थी, पालक आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याचे चित्र दिसत आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित राहणार असल्याने हा कार्यक्रम चौल परिसरातील चर्चेचा विषय ठरत आहे.

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *