हुतात्मा शेषनाथ वाडेकरांचे स्मारक झुडपात गाडलेले – स्वातंत्र्यवीराचा अपमान, प्रशासन झोपेत.
Views: 54 दिनांक : १७ ऑगस्ट २०२५ सचिन मयेकर – छावा न्यूज पोर्टल-रेवदंडा स्वातंत्र्य म्हणजे केवळ राजकीय सत्ता मिळवणं नाही, तर मातृभूमीसाठी प्राणार्पण करण्याची तयारी. अशा तयारीने १९५५ मध्ये गोवा मुक्तीसंग्रामात रक्त सांडून तिरंगा फडकवणारे रायगडातील शूरवीर हुतात्मा शेषनाथ वाडेकर आज इतिहासाच्या पानावर अजरामर आहेत. पण दुर्दैवाने, रेवदंड्यात उभारलेले त्यांचे स्मारक आज झुडपांत गाडले गेले…
![]()

