ठळक बातम्या

माथेरानमध्ये चोरट्यांनी दुकान फोडले

Views: 19 माथेरान | प्रतिनिधी २० जुलै माथेरानमधील इंदिरा गांधी नगर येथील साईसृष्टी कोल्ड्रिंग व किराणा स्टोअरमध्ये शुक्रवारी रात्री चोरट्यांनी घातकी चोरी केली. अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे टाळे व कड्या उचकटून दुकानात प्रवेश करत रोकड तसेच सिगारेटच्या पॅकेट्ससह अंदाजे १५ ते २० हजार रुपयांचा माल लंपास केला. दुकानाचे मालक महेंद्र सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरट्यांनी मागील…

Loading

Read More

पेणमधील सावकारांना पोलिसांचा धडाका —

Views: 47 पोलीस अधीक्षक आचल दलाल यांची धडक कारवाई जनतेच्या तक्रारीला प्रतिसाद, बेकायदेशीर सावकारीचा पर्दाफाश! अलिबाग-प्रतिनिधी २० जुलै पेण तालुक्यातील चिंचपाडा येथे बेकायदेशीररित्या सावकारीचा व्यवसाय चालवत नागरिकांची आर्थिक लूट करणाऱ्या दोन सावकारांवर अखेर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. रायगड स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने एकाच वेळी छापे टाकून शेकडो वचनचिट्ट्या, धनादेश आणि संशयास्पद कागदपत्रे जप्त…

Loading

Read More

संपादकीय भाग ४ -ज्यांनी स्मृती जपल्या – त्यांचं आपण काय केलं?

Views: 33 छावा, संपादकीय | दि. २० जुलै (सचिन मयेकर) रामदास बोट दुर्घटनेनंतर स्मारक, शासन आणि समाजाच्या प्रतिक्रियेचा लेखाजोखा मृत्यू लाटांमध्ये, स्मृती किनाऱ्यावर… १७ जुलै १९४७ रोजी समुद्रात बुडालेल्या ‘रामदास’ बोटीतून सुमारे ७०० हून अधिक जण कधीच परतले नाहीत. मात्र, त्यांची नावे परत आली – आठवणीतून, स्वप्नांतून, आणि कुठल्यातरी कोपऱ्यातल्या घरगुती देवघरातून. आज ७८ वर्षांनंतरही,…

Loading

Read More

एक जॉब असाही..

Views: 7 तुमचं काम काय? मी एक ज्येष्ठ नागरिकांची देखभाल करणारा आहे… या उत्तरात मानवीयतेचा, कर्तव्यबुद्धीचा आणि एका अवघड जबाबदारीचा सारा भार सामावलेला असतो. श्रीमंत घरात राहणारे, उद्योगपती किंवा कामानिमित्त सतत बाहेर असणारे लोक आपल्या घरातील वयोवृद्ध आई-वडिलांसाठी एक व्यक्ती ठेवतात. ती व्यक्ती केवळ ‘नोकरी’ करत नसते… ती जिव्हाळा, कळकळ आणि धीर यांचं काम करत…

Loading

Read More

निजामपूरचं नवं नाव – आता रायगडवाडी

Views: 40 छावा दि. १९ जुलै रेवदंडा (सचिन मयेकर) रायगड जिल्ह्यातील छत्रा–निजामपूर ग्रामपंचायतीच्या नावात बदल करत आता रायगडवाडी हे नाव देण्यात आलं आहे. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी याची अधिकृत घोषणा विधानसभेत केली. ही फक्त एक नावबदलाची कारवाई नसून — इतिहास, अस्मिता, आणि स्वाभिमानाशी जोडलेली एक वैचारिक जाणीव आहे. छत्रपति शिवाजी महाराजांनी जिथे हिंदवी स्वराज्याची…

Loading

Read More

एसटी बस की मृत्यूची सवारी? — बाजारपेठांत धावणाऱ्या एसटींची बेजबाबदार स्पर्धा

Views: 79 छावा, संपादकीय | दि. १९ जुलै(सचिन मयेकर) १८ जुलै रोजी रेवदंडा येथील गोळा स्टॉपजवळ एक हृदयद्रावक घटना घडली. ७७ वर्षीय मथुरा वरसोलकर या वयोवृद्ध महिला एसटी बसच्या धडकेत मृत्युमुखी पडल्या. त्या आपल्या डोळ्याच्या तपासणीवरून घरी परत येत होत्या. रस्त्याने पायी चालत असताना पाठीमागून आलेल्या एसटी बसने जोराची धडक दिली, आणि क्षणात साऱ्या आयुष्याचा…

Loading

Read More

संपादकीय भाग ३ – कोण बुडालं? बोट की यंत्रणा? – ‘रामदास’ दुर्घटनेतील तांत्रिक दोषांचा अभ्यास

Views: 25 छावा, संपादकीय | दि. १९ जुलै(सचिन मयेकर) १७ जुलै १९४७ रोजी झालेली ‘रामदास’ बोट दुर्घटना ही केवळ निसर्गाचा कहर नव्हता. तो होता मानवनिर्मित चुकांचा एक साखळीप्रकार, जिथे बोटीची रचना, प्रशासनाची दुर्लक्ष आणि हवामान यांचा अपायकारक संगम झाला. बोटीची रचना आणि कमतरता ‘रामदास’ ही ९० फूट लांब, २४ फूट रुंद आणि ११ फूट खोल…

Loading

Read More

गोळा स्टॉपजवळ एसटी बसची धडक वृद्ध पादचारी महिलेचा मृत्यू; चालकावर गुन्हा दाखल

Views: 65 छावा दि. १९ जुलै रेवदंडा (सचिन मयेकर) गोळा स्टॉपजवळ गुरुवारी (दि. १८ जुलै) एक दुर्दैवी अपघात घडला. बोर्ली गावातील मधला पाडा येथील ७७ वर्षीय मथुरा रामचंद्र वरसोलकर या रस्त्याने पायी जात असताना, पाठीमागून आलेल्या एसटी बसने त्यांना जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत त्यांच्या डोक्यावरून चाक गेल्यामुळे त्या घटनास्थळीच मृत्युमुखी पडल्या. मथुरा वरसोलकर…

Loading

Read More

सलाम तुझ्या बहाद्दूरीला…

Views: 243 छावा दि.१८ जुलै रेवदंडा (सचिन मयेकर) सलाम तुझ्या बहाद्दूरीला… गेली का रे परत? एमएसईबी वाले काही करत नाहीत का? – असे आपण सहज म्हणतो… पण लाईट परत येते कशी? कोण आणतो ती? रेवदंडा गावातील या फोटोतील योद्ध्याकडे पाहा — सुमारे २८ फूट उंच पोलावर चढलेला, अंगावर धूप आणि डोक्यावर धोका… फक्त आपल्या घरात…

Loading

Read More

ब्रेकिंग अपडेट | गोळा स्टॉपजवळ एसटी बसची धडक — बोर्ली गावातील वयोवृद्ध महिलेचा दुर्दैवी अंत

Views: 634 छावा दि.१८ जुलै रेवदंडा (सचिन मयेकर) रेवदंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या गोळा स्टॉपजवळ आज दुपारी एक दुर्दैवी अपघात घडला. बोर्ली गावातील मधला पाडा येथे राहणाऱ्या मथुरा वरसोलकर (वय अंदाजे ७० वर्षे) या वयोवृद्ध महिलेला एमएच-२० बीएल-३९३३ क्रमांकाच्या स्वारगेट–मुरूड मार्गावरील एस.टी. बसने जोरात धडक दिली. प्राथमिक माहितीनुसार, धडकेनंतर त्यांच्या डोक्यावरून बसचे चाक गेल्याने त्या…

Loading

Read More