५२.२ टन कचरा हटवून स्वच्छतेचा महामंत्र… १,२१० श्री सदस्यांचे व ग्रामस्थांचे श्रमदान; साळाव चेकपोस्ट ते अलिबाग दुतर्फा रस्ता व नागाव सहन बायपास पुलापर्यंत ५३ किलोमीटर रस्त्यांची स्वच्छता

छावा डिजिटल न्यूज पोर्टल | सचिन मयेकर | रेवदंडा  दि. ३० ऑगस्ट २०२६  स्वच्छता ही केवळ एका दिवसाची मोहीम नसून प्रत्येक नागरिकाच्या मनात रुजणारी जीवनपद्धती व्हावी, या उद्देशाने डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या वतीने आज, रविवार दि. ३० ऑगस्ट रोजी रेवदंडा परिसरासह साळाव ते अलिबाग मार्गावर व्यापक स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानात तब्बल…

Loading

Read More

काल रक्षाबंधनाचा उत्साह; राखीच्या धाग्यात जपला भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा बंध भावाच्या मनगटावर राखी बांधून बहिणींनी सुखी, निरोगी व दीर्घायुष्यासाठी केली प्रार्थना; बाजारपेठांमध्ये राख्या, मिठाई व भेटवस्तूंच्या खरेदीसाठी गर्दी

 छावा डिजिटल न्युज मीडिया | रेवदंडा — सचिन मयेकर | २९ ऑगस्ट २०२६ भाऊ-बहिणीच्या अतूट प्रेमाचे, विश्वासाचे आणि जिव्हाळ्याचे प्रतीक असलेला रक्षाबंधनाचा सण काल रेवदंडा व थेरोंडा व परिसरात मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यात आला. सकाळपासूनच घराघरांत रक्षाबंधनाची लगबग पाहायला मिळाली. बहिणींनी भावांच्या मनगटावर प्रेमाने राखी बांधून त्यांच्या सुखी, निरोगी आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली….

Loading

Read More

मला वाचवा…’ आईची ती आर्त हाक काळीज चिरून गेली; काही तासांत आई-बाळाचा दुर्दैवी अंत रीवा येथील शासकीय रुग्णालयातील धक्कादायक घटना; कुटुंबीयांचा हलगर्जीपणाचा आरोप, चौकशी सुरू

मला वाचवा… मला इथून घेऊन चला… मला भीती वाटते… छावा डिजिटल न्युज मीडिया | रीवा | २९ ऑगस्ट २०२६ रुग्णालयाच्या परिसरात एका आईचा हा आक्रोश ऐकू आला आणि काही तासांतच त्या आईसह तिच्या नवजात बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाला. मध्य प्रदेशातील रीवा येथील संजय गांधी मेमोरियल शासकीय रुग्णालयातील या घटनेने सर्वांनाच हादरवून सोडले आहे. मृत्यूपूर्वीचा व्हिडिओ…

Loading

Read More

सण आलेत… पण महागाईने स्वयंपाकघरात पेटवली चिंता! राखीच्या धाग्यात प्रेम, जन्माष्टमीच्या प्रसादात गोडवा आणि गणरायाच्या नैवेद्यात भक्ती… पण या सगळ्याचा खर्च भागवताना सामान्य माणसाच्या खिशाला बसतोय महागाईचा चटका

छावा विशेष संपादकीय नारळी पौर्णिमा झाली… आज रक्षाबंधनाचा पवित्र सण… पुढे जन्माष्टमीची चाहूल आणि त्यानंतर लाडक्या गणरायाचे आगमन. महाराष्ट्रात सणांचा उत्साह आता शिगेला पोहोचणार आहे. घराघरांत साफसफाई, पूजा, नैवेद्य, गोडधोड, पाहुणचार आणि खरेदीची लगबग सुरू आहे. पण या आनंदाच्या वातावरणात एक प्रश्न मात्र सर्वसामान्य कुटुंबाच्या मनात घर करून बसला आहे “सण साजरे करायचे तरी किती…

Loading

Read More

धडाकेबाज मनीष ठाकूर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

रेवदंडा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले कर्तव्यदक्ष पोलीस कर्मचारी मनीष दीनानाथ ठाकूर यांचा दि. २६ ऑगस्ट रोजी वाढदिवस उत्साहात पार पडला. कर्तव्याशी प्रामाणिक, जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर आणि आपल्या कार्यातून वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या मनीष  ठाकूर यांना वाढदिवसानिमित्त छावा परिवाराकडून लाख लाख शुभेच्छा. आपल्या आयुष्यात सुख, समाधान, उत्तम आरोग्य आणि यशाची सदैव भरभराट होत राहो. आपल्या…

Loading

Read More

राखीच्या उंबरठ्यावर बहिणीचा त्याग… मरणाच्या दारात असलेल्या भावासाठी बहिणीने दिला स्वतःच्या शरीराचा अवयव; तरी भावाचा मृत्यू ₹६५ लाखांच्या बिलाने नवे प्रश्न

छावा डिजिटल न्यूज मीडिया  | संपादकीय  राखी पौर्णिमा उंबरठ्यावर आहे… बहिणीच्या हातात राखी आहे, भावाच्या मनगटावर प्रेमाचा धागा बांधण्याची तयारी आहे. पण याच राखीच्या उंबरठ्यावर समोर आलेली नागपुरातील ही घटना मन सुन्न करणारी आहे…भावाचा जीव वाचावा म्हणून एका बहिणीने स्वतःच्या शरीराचा अवयव दान केला. रक्ताचं नातं तर प्रत्येकाचं असतं… पण भावासाठी स्वतःच्या शरीराचा एक भाग…

Loading

Read More

नारळी पौर्णिमा व रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा..

आपली संस्कृती… आपली परंपरा… आपले सण..  नारळी पौर्णिमा — समुद्राशी नातं जपणारा, आपल्या कोळी बांधवांच्या परंपरेचा आणि निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा मंगल सण…  रक्षाबंधन — भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा, विश्वासाचा आणि अतूट नात्याचा पवित्र उत्सव… या दोन्ही मंगल पर्वांच्या निमित्ताने सर्व ग्रामस्थांना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.आपली संस्कृती, आपली परंपरा आणि आपल्या माणसांशी असलेलं नातं सदैव असंच घट्ट राहो… …

Loading

Read More

२८ ऑगस्टपासून महाराष्ट्रात धर्मांतरावर नवा कायदा; मुलांच्या धर्माबाबतही महत्त्वाची तरतूद

छावा डिजिटल न्यूज मीडिया मुंबई   महाराष्ट्रात धर्मांतराच्या मुद्द्यावर आता कायद्याचा कडक अंकुश येणार आहे. ‘महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य अधिनियम २०२६’ची अंमलबजावणी २८ ऑगस्ट २०२६ पासून राज्यभर होणार आहे. राज्य सरकारने याबाबत अधिसूचना जारी केली असून, बळजबरी, फसवणूक, आमिष, चुकीची माहिती, दबाव किंवा विवाहाच्या माध्यमातून होणाऱ्या बेकायदेशीर धर्मांतरावर कठोर कारवाईची तरतूद करण्यात आली आहे. या नव्या कायद्यातील…

Loading

Read More

जंगल कमी, अन्नाचा शोध वाढला; रेवदंड्यात वानरांचा धुमाकूळ

छावा डिजिटल न्यूज मीडिया रेवदंडा | सचिन मयेकर रेवदंडा परिसरात वानरांचा धुमाकूळ वाढला असून, भाजीपाला विक्री करणाऱ्या महिलांना त्याचा मोठा फटका बसत आहे. नुकतेच वानरांनी केळीचे घड पळवून नेऊन फस्त केल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे विक्रेत्यांचे नुकसान होत असून नागरिकांमध्येही चिंता व्यक्त होत आहे. विशेषतः संध्याकाळच्या सुमारास वानरांच्या टोळ्या गावाच्या दिशेने येताना दिसतात. जंगल…

Loading

Read More

तो मरण्यासाठी डोंगरावर गेला नव्हता…हुशार स्वाभिमानी कुणालचा नेमका हेतू समोर आई-वडिलांचा वाद थांबवण्यासाठी गेलेला मुलगा स्वतःच नियतीचा बळी ठरला

छत्रपती संभाजीनगरच्या खवड्या डोंगरावर घडलेली चांदगुडे कुटुंबाची शोकांतिका आता नव्या माहितीनंतर वेगळ्याच वळणावर आली आहे. घटना घडल्यानंतर सर्वत्र एकच चर्चा होतीiPhoneचा हट्ट, EMIचा ताण आणि त्यावरून झालेला वाद. कुणालकडे आधीपासूनच दोन iPhone होते. त्यामुळे iPhoneसाठीच त्याने हे पाऊल उचललं, ही चर्चा चुकीची आहे. कुणालला आई-वडिलांमधील घरगुती वाद थांबवायचा होता आणि त्यांना भीती दाखवण्यासाठी तो डोंगरावर गेला…

Loading

Read More