नराधमांचा डिजिटल जाळा बॉम्बस्फोटचा खोटा आरोप तुम्ही मनी लॉन्ड्रिंग करता म्हणत २७ लाखांची लूट

छावा डिजिटल मीडिया – सचिन मयेकर  दिनांक : ०५ मे २०२६

रायगड जिल्ह्यात सायबर गुन्हेगारांचा धुमाकूळ सुरूच असून, “डिजिटल अरेस्ट”च्या नावाखाली आणखी एक धक्कादायक फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे. रेवदंडा पोलीस स्टेशन हद्दीत घडलेल्या या प्रकरणात, व्हॉट्सअ‍ॅप व्हिडिओ कॉलद्वारे स्वतःला उत्तर प्रदेशातील लखनऊ येथील ATS अधिकारी असल्याचे भासवून एका व्यक्तीकडून तब्बल ₹27 लाखांची उकळपट्टी करण्यात आली.

आरोपींनी फिर्यादीला “तुम्ही मनी लॉन्ड्रिंगचा व्यवसाय करता आणि तुमचा बेलगाव बॉम्बस्फोट प्रकरणाशी संबंध आहे” असा खोटा आरोप करत अटक, चौकशी व मीडियामध्ये बदनामीची धमकी दिली. या भीतीखाली फिर्यादी पूर्णपणे मानसिक दबावात गेला. “डिजिटल अरेस्ट”च्या नावाखाली त्याला सतत संपर्कात ठेवत आरोपींनी त्याच्याकडून मालमत्तेची माहिती उकळली.

यानंतर आरोपींनी “तुमचे सर्व फिक्स डिपॉझिटचे पैसे काढून आम्हाला पाठवा, आम्ही ते ब्लॅक की व्हाईट आहेत हे तपासू” असे सांगत फिर्यादीला फसवले. भीतीपोटी फिर्यादीने आपल्या बँकेतील फिक्स डिपॉझिट फोडले तसेच दागिने विकून ₹27 लाख रुपये तीन वेगवेगळ्या खात्यांमध्ये ट्रान्सफर केले. पैसे मिळताच आरोपींनी संपर्क तोडला आणि फसवणूक उघडकीस आली.

या प्रकरणी रेवदंडा पोलीस स्टेशनमध्ये भारतीय दंड संहितेच्या कलम 316(2) आणि कलम 318, तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार कलम 66(c) आणि 66(d) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सायबर पोलीसांकडून सुरू असून आरोपींचा शोध घेतला जात आहे.

 रायगडमध्ये सायबर गुन्ह्यांचा वाढता विळखा

अशा प्रकारच्या घटना आता रायगड जिल्ह्यात वारंवार घडताना दिसत आहेत. बनावट अधिकारी बनून धमक्या देणे आणि नागरिकांकडून पैसे उकळणे हा गुन्हेगारांचा नवा ट्रेंड बनला आहे. या फसवणुकीतून आरोपी लाखो-कोटींची उलाढाल करत असून सर्वसामान्य नागरिकांना लक्ष्य केले जात आहे.

 नागरिकांनो सतर्क राहा

 कोणतीही सरकारी यंत्रणा व्हिडिओ कॉलवर चौकशी करत नाही “अटक होईल” अशी धमकी देणारे कॉल = फसवणूक कोणत्याही परिस्थितीत पैसे ट्रान्सफर करू नका त्वरित सायबर क्राईम हेल्पलाईन किंवा पोलीसांशी संपर्क साधा

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *