चौल-सागमळा येथून ७० वर्षीय ज्येष्ठ नागरिक बेपत्ता; शोध घेण्याचे आवाहन
काशिनाथ बाळू घरत उर्फ बाबू डाय (वय ७० वर्षे) हे दिनांक ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री चौल-सागमळा येथील राम मंदिर परिसरातून बेपत्ता झाले आहेत.
छावा डिजिटल न्यूज मीडिया ता.०२ नोव्हेंबर २६ सचिन मयेकर
त्यांचा कुटुंबीयांकडून शोध सुरू असून, अद्याप त्यांच्याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही.
सदर व्यक्ती कोणाला दिसल्यास किंवा त्यांच्याबाबत काही माहिती मिळाल्यास तात्काळ त्यांचे पुत्र अमोल घरत यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
संपर्क : अमोल घरत (मुलगा)
मो. ९९६७९८२४१०
छावा परिवाराचे माणुसकीचे आवाहन
आज काशिनाथ घरत हे कोणाचे तरी वडील, कोणाचे तरी कुटुंबप्रमुख आहेत. त्यांच्या कुटुंबीयांवर सध्या काय परिस्थिती ओढवली असेल, याची कल्पनाही करवत नाही. उद्या अशी वेळ आपल्या घरावरही येऊ शकते. आपल्या घरातील एखादी ज्येष्ठ व्यक्ती हरवली तर आपण कोणत्या मानसिक अवस्थेतून जाऊ, याचा क्षणभर विचार करा. म्हणून केवळ बातमी वाचून पुढे जाऊ नका, तर ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. माणुसकी दाखवा, एका कुटुंबाला त्यांचे वडील सुखरूप परत मिळवून देण्यासाठी मदतीचा हात पुढे करा. हीच छावा परिवाराची सर्व नागरिकांना कळकळीची विनंती!
![]()

