ब्रेकिंग बागमळ्याजवळ ताडाच्या झाडावर वीज कोसळली पेट्रोल पंप परिसरात खळबळ
छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल बागमळा २१ एप्रिल २०२६
सचिन मयेकर
आज सकाळपासून परिसरात प्रचंड विजांचा कडकडाट आणि मुसळधार पावसाची जोरदार सरी सुरू होत्या. याचदरम्यान बगमळ्याजवळील पेट्रोल पंपाच्या पाठीमागे असलेल्या ताडाच्या उंच झाडावर अचानक वीज कोसळली.
वीज पडताच झाडाने क्षणार्धात पेट घेतला आणि आकाशात ठिणग्यांचा वर्षाव होत असल्याचे थरारक दृश्य पाहायला मिळाले. मुसळधार पावसातही झाडाला लागलेली आग काही काळ धगधगत राहिल्याने परिसरात एकच भीतीचे वातावरण निर्माण झाले.
घटनेच्या ठिकाणाजवळच CNG व पेट्रोल पंप असल्याने संभाव्य धोका लक्षात घेता परिसरात घबराट पसरली. मात्र सुदैवाने कोणतीही दुर्घटना घडू शकली नाही.
नागरिकांना आवाहन:
वादळी पावसात आणि विजांच्या कडकडाटात उघड्या जागेत थांबणे टाळावे, झाडे व विद्युत यंत्रणांपासून दूर राहावे.
🟥 छावा – आपल्या परिसरातील प्रत्येक घडामोडीवर बारीक नजर!
![]()

