नराधमाची अमानुष कृत्ये मानवतेलाच काळीमा प्राथमिक वैद्यकीय अहवालातून गंभीर बाबी उघड नसरापूर प्रकरण: प्राथमिक वैद्यकीय अहवालातून धक्कादायक तपशील समोर

छावा डिजिटल मीडिया – सचिन मयेकर | दिनांक : ०५ मे २०२६

भोर तालुक्यातील नसरापूर परिसरात १ मे रोजी घडलेल्या संतापजनक घटनेने संपूर्ण पुणे जिल्हा हादरून गेला आहे. आपल्या घरासमोर खेळत असलेल्या एका निष्पाप अल्पवयीन मुलीवर अमानुष अत्याचार करून तिचा दुर्दैवी अंत करण्यात आल्याने सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणातील तपासाला वेग आला असून ससून रुग्णालयाकडून पोलिसांकडे सादर करण्यात आलेल्या प्राथमिक शवविच्छेदन अहवालातून काही गंभीर बाबी समोर आल्या आहेत.

पोलिस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, ६५ वर्षीय आरोपी भीमराव कांबळे याने चिमुरडीला फूस लावून जवळील गोठ्यात नेल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणाची सखोल वैद्यकीय तपासणी करण्यासाठी ससून रुग्णालयातील न्यायवैद्यक विभागात तज्ज्ञांच्या उपस्थितीत ‘इन कॅमेरा’ शवविच्छेदन करण्यात आले असून संबंधित प्रक्रियेत न्यायवैद्यक अधिकाऱ्यांचा सहभाग होता.

प्राथमिक अहवालानुसार, मुलीचा आवाज बाहेर जाऊ नये यासाठी तिच्या तोंडात कपडा कोंबल्याची शक्यता वर्तवली जात आहे, तसेच शरीरावर मारहाणीचे काही व्रण आढळल्याची माहिती समोर येत आहे. मात्र मृत्यूचे नेमके कारण निश्चित करण्यासाठी अंतर्गत अवयवांचे नमुने पुढील तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले असून अंतिम अहवालाची प्रतीक्षा आहे.

दरम्यान, पोलिसांकडून तपास अत्यंत गांभीर्याने सुरू असून आरोपीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. या प्रकरणामुळे आरोपीच्या कुटुंबातूनही तीव्र संताप व्यक्त होत असून त्यांनी आरोपीशी संबंध तोडल्याचे सांगत कठोर शिक्षेची मागणी केली आहे.

या घटनेची गंभीर दखल घेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी गुन्हेगाराला कठोरात कठोर शिक्षा दिली जाईल आणि खटला जलदगती न्यायालयात चालवण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे.

अशा घटना समाजासाठी अत्यंत वेदनादायक आणि चिंताजनक आहेत. लहान मुलांच्या सुरक्षेबाबत अधिक सतर्क राहण्याची गरज या घटनेने पुन्हा अधोरेखित केली आहे. आता एकच अपेक्षा 

⚖️ न्याय जलद, कठोर आणि कायद्याच्या चौकटीत राहून उदाहरण ठरणारा असला पाहिजे.

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *