आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी २९ जूनपर्यंत पोलीस कोठडीत; केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणात नवे धक्कादायक खुलासे

🟥 छावा डिजिटल न्यूज पोर्टल | २४ जून २६ – सचिन मयेकर

लोहगड किल्ल्यावरून पडून मृत्यू झालेल्या 26 वर्षीय केतन अग्रवाल प्रकरणात दररोज नवे धक्कादायक खुलासे समोर येत असून संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष या प्रकरणाकडे लागले आहे. सुरुवातीला अपघात म्हणून समोर आलेल्या या घटनेने आता मोठे वादळी वळण घेतले आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी याला न्यायालयाने 29 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांच्या तपासानुसार, केतन अग्रवाल यांचा मृत्यू हा साधा अपघात नसून पूर्वनियोजित कटाचा भाग आहें. तपासादरम्यान समोर आलेले सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल कॉल रेकॉर्ड, लोकेशन डेटा आणि इतर तांत्रिक पुरावे यामुळे तपासाला वेग आला आहे.

तपास यंत्रणांच्या हाती लागलेल्या माहितीमुळे या प्रकरणातील अनेक गुपिते उलगडत असल्याचे सांगितले जात आहे. भर उन्हात हुडी घालून चेहरा झाकणाऱ्या एका संशयित युवकाच्या हालचालींनी पोलिसांचा संशय बळावला. त्यानंतर तपासाची साखळी थेट चेतन चौधरीपर्यंत पोहोचल्याचे वृत्त आहे. दरम्यान, यापूर्वीही सियाकडून केतन यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न झाला होता का, याचाही तपास सुरू आहे. त्यामुळे हे प्रकरण केवळ एका दिवसाच्या घटनेपुरते मर्यादित नसून त्यामागे मोठे कटकारस्थान होते का, याचा शोध पोलीस घेत आहेत. केतन अग्रवाल यांचे नोव्हेंबर महिन्यात भव्य लग्न होणार होते. लग्नाच्या तयारीला वेग आला असतानाच घडलेल्या या घटनेने केतन अग्रवाल यांच्या कुटुंबांना मोठा धक्का बसला आहे. केतन यांच्या कुटुंबीयांनी आरोपींना कठोर शिक्षा व्हावी फाशी व्हावी अशी मुख्यमंत्री यांना मागणी केली आहें जेणेकरून पुढे तरी असे ओरकार होण्याचे थांबतील तसेच तपास जलदगतीने पूर्ण व्हावा अशी मागणी केली आहे.

पोलीस कोठडी मिळाल्यामुळे आता तपास अधिक वेगाने पुढे जाणार असून आणखी काही धक्कादायक खुलासे समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष आता या प्रकरणातील पुढील तपास आणि न्यायालयीन प्रक्रियेकडे लागले आहे.

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *