अलिबाग न्यायालय परिसरात वाहनांची प्रचंड कोंडी न्यायालय परिसरातील वाहनांच्या गर्दीमुळे ये-जा करणाऱ्यांची गैरसोय नागरिक त्रस्त



🟥 छावा डिजिटल न्यूज पोर्टल | २३ जून २६ – अलिबाग – सचिन मयेकर
अलिबाग न्यायालय परिसरात मंगळवारी वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे व पार्किंगवरील ताणामुळे आणि वाढत्या गर्दीमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. न्यायालय परिसरातील वाहनांच्या गर्दीमुळे ये-जा करणाऱ्यांची गैरसोय झाली आणि नागरिक यांना या कोंडीचा फटका बसला. याच वेळेला पक्षकार वकील यांनाही पार्किंग करण्यासाठी जागा उरली नाही.
न्यायालयाच्या परिसरातील काही भागात वाहनांच्या रांगा लागल्याने ये-जा करणे कठीण झाले होते. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला आणि ग्रामीण भागातून आलेल्या पक्षकारांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागल्याची चर्चा परिसरात होती.
न्यायालयात कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना पार्किंग आणि वाहतूक व्यवस्थापनाकडे अधिक लक्ष देण्याची गरज असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले. आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिका किंवा इतर महत्त्वाच्या वाहनांना मार्ग मिळणेही अवघड होऊ शकते, अशी चिंता व्यक्त होत आहे.
स्थानिक प्रशासन आणि संबंधित यंत्रणांनी न्यायालय परिसरातील वाहतूक व्यवस्थेचा आढावा घेऊन योग्य नियोजन करावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
![]()

