रामेश्वर मित्र मंडळाच्या जलतरण स्पर्धेत युवा जलतरणपटूंची चमकदार कामगिरी

छावा डिजिटल न्युज मीडिया |चौल | सचिन मयेकर

 दरवर्षीप्रमाणे यंदाही १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून रामेश्वर मित्र मंडळाच्या वतीने रामेश्वर मंदिर, पोखरण येथे भव्य जलतरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. दुपारी ३ वाजता झालेल्या या स्पर्धेला जलतरणपटू, क्रीडाप्रेमी, ग्रामस्थ व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विविध वयोगटांतील स्पर्धकांनी उत्साहाने सहभाग घेत आपल्या जलतरण कौशल्याचे दर्शन घडविले.

स्पर्धेतील गट क्रमांक १ – मुले ओंडे बांधून या प्रकारात श्रीयांश अमोल म्हात्रे यांनी प्रथम, वंश रोहित कड यांनी द्वितीय, तर ओजस नितीन राऊत यांनी तृतीय क्रमांक पटकावला.

गट क्रमांक २ – मुले डबल फेरी : प्रथम दिवांशू कुथे, द्वितीय हर्ष योगेश ठाकूर, तृतीय श्रावण विलास इंद्रे.

गट क्रमांक ३ – मुले सिंगल फेरी : प्रथम रियांश मनोज ठाकूर, द्वितीय सोहम सुनील घरत, तृतीय अद्वैत विजय वाघमारे.

गट क्रमांक ४ – मुले डबल फेरी : प्रथम सार्थक मारुती इंद्रे, द्वितीय मयूष मनोज ठाकूर, तृतीय अंश भोईर.

गट क्रमांक ५ – मुली ओंडे बांधून : प्रथम आदिश्री हेमंत जाधव, द्वितीय ओवी प्रशांत किवळेकर, तृतीय श्रीषा रोहित पाटील.

गट क्रमांक ६ – मुले डबल फेरी : प्रथम क्रिश विजय कुथे, द्वितीय वेद मंगेश कुथे, तृतीय मनन जीवन घसे.

गट क्रमांक ७ – मुले सिंगल फेरी : प्रथम आयुष शर्मा, द्वितीय अर्णव बळीराम पाटील, तृतीय यश शर्मा.

गट क्रमांक ८ – मुले ओंडे बांधून : प्रथम आराध्य आशिष ठाकूर, द्वितीय रुद्र विलास जाधव, तृतीय सानिध्य सुचित वर्तक.

गट क्रमांक ९ – मुली सिंगल फेरी : प्रथम तीर्था प्रमोद वाजंगी, द्वितीय प्रेषिता पाटील, तृतीय पलक पाटील.

गट क्रमांक १० – मुले सिंगल फेरी : प्रथम अर्णव प्रज्वल सकपाळ, द्वितीय रुद्र दि. टिवळेकर, तृतीय जय जितेंद्र म्हात्रे.

गट क्रमांक ११ – मुली ओंडे बांधून : प्रथम श्रीशा संदेश वर्तक, द्वितीय ओवी दिलीप धुमाळ, तृतीय कृतिक आशिष राऊत.

गट क्रमांक १२ – श्री रामेश्वर गट : प्रथम विनायक यशवंत नाईक, द्वितीय जितेंद्र रामचंद्र जाधव, तृतीय ओमकार प्रशांत जाधव.

गट क्रमांक १३ – मुले सिंगल फेरी : प्रथम हर्षवर्धन म्हात्रे, द्वितीय संचित स्वप्नील कवळे, तृतीय निश नागेश पेरेकर.

गट क्रमांक १४ – मुली सिंगल फेरी : प्रथम प्रेक्षिका पाटील, द्वितीय सई पिलणकर, तृतीय आरोही राऊत.

स्पर्धेतील सर्वांचे लक्ष वेधून घेणाऱ्या गट क्रमांक १५ – फायनल, तीन फेऱ्या या अंतिम फेरीत प्रथम क्रमांक दिवांशू कुथे, द्वितीय क्रमांक रोहित कुथे, तृतीय क्रमांक प्रेम पाटील, तर चौथा क्रमांक सार्थक इंद्रे यांनी पटकावला.

या जलतरण स्पर्धेसाठी भाग्यश्री ज्वेलर्स, नीलेश खोत, जितेंद्र जाधव आणि सिद्धांत वार्डे यांच्याकडे स्पर्धकांची नोंदणी करण्यात आली होती. स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करून गौरव करण्यात आला.

रामेश्वर मित्र मंडळाच्या या उपक्रमामुळे परिसरातील बाल व युवा जलतरणपटूंना आपल्या क्रीडा कौशल्याला व्यासपीठ मिळाले. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेने क्रीडाप्रेमी आणि ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण केले.

रामेश्वर मित्र मंडळाच्या वतीने दरवर्षी आयोजित होणाऱ्या या स्पर्धेची परंपरा यंदाही उत्साहात कायम राहिली असून, भविष्यातही अशाच प्रकारे क्रीडा क्षेत्रातील नवोदितांना प्रोत्साहन देण्याचा मंडळाचा उपक्रम कौतुकास्पद ठरला.

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *