शहीद निलेश तुणतुणे यांच्या स्मृतींना देशभक्तीपर गीतांनी उजाळा ओंकार काटले प्रस्तुत ‘सप्तसुरांची मैफिल’ दिमाखात; कलाकारांच्या सुरांनी भारावले वातावरण

छावा डिजिटल न्युज मीडिया |सहानगोटी | सचिन मयेकर

१५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून शहीद निलेश तुणतुणे यांच्या स्मृतींना अभिवादन आणि त्यांच्या शौर्याला सलाम करण्यासाठी ओंकार काटले मित्र मंडळातर्फे ओंकार काटले प्रस्तुत ‘ऑर्केस्ट्रा मैफिल  सप्तसुरांची बँड’ या देशभक्तीपर कार्यक्रमाचे आयोजन सहागोटी येथे करण्यात आले. यंदा या कार्यक्रमाचे चौथे वर्ष असून, देशभक्तीपर गीतांच्या सुरांनी संपूर्ण वातावरण भारावून गेले.

शहीद निलेश तुणतुणे यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या शौर्याला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. देशासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या वीर जवानांच्या स्मृती जपण्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामागे ओंकार काटले यांचे उत्तम नियोजन आणि परिपूर्ण आयोजन विशेष चर्चेचा विषय ठरले. वाघोडे गावचे उत्तम ढोलकीपटू जीवन सुरेंद्र पवार यांनीही आपल्या दमदार वादनातून कार्यक्रमाची रंगत वाढवली. ओंकार काटले यांच्यासह सर्व कलाकारांनी एकत्रितपणे मेहनत घेत कार्यक्रमाला यशस्वी केले.

या कार्यक्रमाला रेवदंडा पोलीस ठाणे, अलिबाग पोलीस ठाणे तसेच दामिनी पथकातील महिला पोलीस यांची उपस्थिती लाभली. तसेच सौ. हर्षदा निखिल मयेकर, सरपंच ग्रुप ग्रामपंचायत नागाव; ॲड. मानसी संतोष म्हात्रे, उपनगराध्यक्ष अलिबाग नगरपरिषद; अनिल बंधू सहान; विवेक पाटील, समाजसेवक; प्रवीण दादा रणवरे, समाजसेवक यांच्यासह विविध मान्यवर, पदाधिकारी व सहकाऱ्यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाच्या माध्यमातून मुलांसाठी खाऊ तसेच शैक्षणिक साहित्य व पुस्तके वाटप करण्यात आली. सामाजिक बांधिलकी जपत आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे उपस्थितांकडून कौतुक करण्यात आले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी न्यू कट्टा मित्र मंडळ आणि विशेषतः संजय पोईलकर यांनी केलेल्या सहकार्याबद्दल ओंकार काटले यांनी मनःपूर्वक आभार व्यक्त केले.

‘सप्तसुरांची बँड’च्या कलाकारांनी रंगवली मैफिल

या देशभक्तीपर मैफिलीत गायक व ढोलकीपटू जीवन पवार, कीबोर्ड वादक भूषण सुतार, पॅड वादक तेजस माळी, गायिका सारथी माळी, गायक अलंकार पाटील, गायिका मानसी पाटील, गायिका दिपाली पवार यांनी आपल्या कलाविष्काराने उपस्थितांची मने जिंकली.

कार्यक्रमाचे निवेदन विनोद नाईक आणि संतोष वाघमारे यांनी केले, तर साऊंड सर्व्हिस आशुतोष पोटे यांनी सांभाळली.

देशभक्तीच्या गीतांनी, कलाकारांच्या सुरांनी आणि शहीद जवानांच्या स्मृतींना वाहिलेल्या भावपूर्ण श्रद्धांजलीने १५ ऑगस्टचा हा कार्यक्रम उपस्थितांच्या कायम स्मरणात राहणारा ठरला.

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *