मनसे सिद्धू धमाका- मनसेच्या दणक्याने २२ वर्षे सेवा देणाऱ्या विष्णू काका व सुचिता काकींना पुन्हा मिळाली नोकरी

अन्याय करणाऱ्या व्यवस्थापनाला मनसेचा खणखणीत इशारा कष्टकऱ्यांना मिळाला न्याय

छावा डिजिटल न्यूज पोर्टल | रेवदंडा – सचिन मयेकर | दि. १०  जून २०२६

पहरूरपाडा येथील रहिवासी विष्णू पाटील काका व सुचिता पाटील काकी यांना कोणतेही ठोस कारण नसताना कामावरून कमी करण्यात आले होते. आवास येथील पिडिलीट वाडी कामत बंगल्यात विष्णू काका तब्बल २२ वर्षे तर सुचिता काकी ८ वर्षे प्रामाणिकपणे सेवा बजावत होत्या. अचानक नोकरी गेल्याने त्यांच्या कुटुंबावर आर्थिक संकट कोसळले होते. अनेक विनंत्या करूनही संबंधित व्यवस्थापनाने त्यांना पुन्हा कामावर घेण्यास नकार दिला. अखेर न्यायाच्या अपेक्षेने त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सिद्धू म्हात्रे यांच्याकडे धाव घेतली. त्यानंतर सिद्धू म्हात्रे व मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी थेट संबंधित ठिकाणी जाऊन व्यवस्थापनाला जाब विचारला. विष्णू काका व सुचिता काकींवर झालेल्या अन्यायाबाबत त्यांनी आक्रमक भूमिका घेतली. मनसेच्या पाठपुराव्यामुळे व्यवस्थापकाने चार दिवसांत दोघांनाही पुन्हा कामावर घेण्याचे आश्वासन दिले. या लढ्यात सरपंच पिंट्या गायकवाड यांचेही मोलाचे सहकार्य लाभले. अखेर दिलेल्या शब्दाप्रमाणे विष्णू काका व सुचिता काकींना पुन्हा कामावर रुजू करून घेण्यात आले. न्याय मिळाल्याच्या आनंदात दोघांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यालयात भेट देत सिद्धू म्हात्रे व सर्व पदाधिकारी-कार्यकर्त्यांचे आभार मानले. गरीब, कष्टकरी आणि अन्यायग्रस्तांच्या पाठीशी मनसे खंबीरपणे उभी राहील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *