छावा film fare विशेष – मंदिरातील भजनापासून ‘सप्तसुरांची मैफिल’पर्यंत… आता आयुष्यातही नवा सूर! लोकप्रिय संगीत निर्माता ओंकार काटले २०२७ मध्ये अडकणार विवाहबंधनात चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण

छावा डिजिटल न्यूज पोर्टल | रायगड- सचिन मयेकर | दि. १९ जून २०२६
एखाद्या कलाकाराचा प्रवास हा नेहमीच मोठ्या मंचावरून सुरू होत नाही. कधी तो एखाद्या छोट्याशा गावातून, मंदिरातील भजनातून आणि मनातल्या एका साध्या स्वप्नातून सुरू होतो. अशाच जिद्दी, मेहनत आणि संगीतप्रेमाच्या बळावर स्वतःची ओळख निर्माण करणारे तरुण संगीत निर्माता ओंकार नरेश काटले आता त्यांच्या आयुष्यातील एका नव्या आणि आनंददायी पर्वात प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत.
अलिबाग परिसरातील एका साध्या शेतकरी कुटुंबात वाढलेल्या ओंकार यांना लहानपणापासूनच संगीताची आवड होती. गावातील राधाकृष्ण हरी कृष्ण मंदिरातील भजन-कीर्तनाच्या वातावरणातून त्यांच्या आयुष्यात संगीताचे बीज रोवले गेले. आजोबा त्यांना लहानपणी भजनासाठी घेऊन जात असत. टाळ-मृदुंगाचा नाद, भक्तिरसाने भारलेले वातावरण आणि सुरांची ओढ याच ठिकाणी त्यांच्या संगीतप्रवासाची सुरुवात झाली.
सुरुवातीला छोट्या कार्यक्रमांमधून गाण्यांची सादरीकरणे करणाऱ्या ओंकार यांनी पुढे स्वतः गाणी तयार करून रसिकांपर्यंत पोहोचवण्यास सुरुवात केली. नागावचे माजी सरपंच निखिल मयेकर यांच्या जीवनावर आधारित गाण्यामुळे त्यांना स्थानिक स्तरावर विशेष ओळख मिळाली. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही.
त्यांच्या यशामागे आई-वडिलांचे आशीर्वाद, कुटुंबाची साथ, संतोष सदाशिव मोरे (बाबूभाई मोरे) यांचे मार्गदर्शन आणि मित्र जीवन पवार यांची खंबीर साथ महत्त्वाची ठरली. एकेकाळी टिंगल-टवाळी करणारेच लोक आज त्यांच्या कार्यक्रमांसाठी निमंत्रण देतात, हीच त्यांच्या यशाची खरी पावती आहे.
आणि आता या यशस्वी प्रवासाला मिळणार आहे प्रेमाची सुंदर साथ.
‘ऑर्केस्ट्रा मैफिल सप्तसुरांची’ या लोकप्रिय कार्यक्रमाचे निर्माते ओंकार काटले २०२७ च्या लग्नसराईमध्ये विवाहबंधनात अडकणार असल्याची आनंदाची माहिती समोर येत आहे. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये, मित्रपरिवारात आणि संगीतप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सुरांच्या मैफिलीतून सुरू झालेला प्रवास… आता सप्तपदीच्या सुंदर बंधनात बांधला जाणारआहें.
मराठी, हिंदी तसेच कोळी गीतांच्या माध्यमातून हजारो रसिकांच्या मनात घर करणारे ओंकार काटले आता आयुष्याच्या नव्या अध्यायाची सुरुवात करणार आहेत. संगीताच्या साथीने सुरू झालेली त्यांची वाटचाल आता संसाराच्या नव्या सुरावटीने अधिक सुंदर होणार आहे.
छावा परिवारातर्फे निर्माते ओंकार काटले यांना भावी वैवाहिक जीवनासाठी मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.ईश्वराच्या कृपेने त्यांचा हा नवा प्रवास सुख, समाधान, प्रेम आणि यशाने भरलेला जावो, हीच सदिच्छा.
![]()

