बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त पंचशील नगर येथे उत्साहात जयंती साजरी

छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल,रेवदंडा १४ एप्रिल २०२६

रेवदंडा प्रतिनिधी. भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त रेवदंडा येथील पंचशील नगरमध्ये मोठ्या उत्साहात आणि नव्या जोशात जयंती साजरी करण्यात आली. जय भीमच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.
सचिन मयेकर

कार्यक्रमाची सुरुवात पंचशील नगर येथे ध्वजारोहणाने झाली. रेवदंडा ग्रामपंचायतीचे सरपंच प्रफुल्ल यशवंत मोरे यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी गौतम बुद्ध तसेच शिवप्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी महामानवांना मानवंदना अर्पण करत त्यांच्या विचारांचा जागर केला.
आजच्या कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्य संतोष मोरे, खलील तांडेल, सुराराम मोहनलाल माळी तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सुरेश खोत, सुहास घोणे, सरोज वरसोलकर, अशोक नाईक, निलेश खोत, हर्षल घरत, शरद वरसोलकर आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमाचे निवेदन प्रकाश पाटील यांनी केले. याच वेळी प्रकाश पाटील यांनी केलेले भाषण अंगावर रोमांच उभे करणारे ठरले. त्यांच्या प्रभावी शब्दांनी उपस्थितांना भारावून टाकले.

भाषणादरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा जागर करत माणसाची ओळख ही पैशाने नाही तर ज्ञानाने होत असते असा संदेश देण्यात आला. जयंतीच्या दिवशीच बाबासाहेबांना आठवू नका तर त्यांच्या विचारांचे रोज आचरण करा असे आवाहन करण्यात आले.
यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दूरदृष्टी आणि शिस्तबद्ध नियोजनाचा उल्लेख करत त्याच परंपरेतून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाज परिवर्तनाची भक्कम पायाभरणी केली असे सांगण्यात आले. तसेच गौतम बुद्ध यांच्या शांतता आणि समतेच्या विचारांचा उल्लेख करत समाजात बंधुता टिकवण्याचे आवाहन करण्यात आले.
भाषणादरम्यान बाबासाहेबांच्या संघर्षमय जीवनातील प्रसंग सांगत त्यांच्या त्यागाची आठवण करून देण्यात आली. दलित व वंचित समाजाचे पोट भरल्याशिवाय माझे पोट भरत नाही या विचारातून त्यांच्या सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडते असे सांगण्यात आले. या प्रभावी भाषणामुळे उपस्थितांच्या अंगावर शहारे आले आणि संपूर्ण परिसर भावनिक वातावरणाने भारून गेला.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मधुकर गायकवाड यांनी केले. कार्यक्रमास समाजातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. नितीन गायकवाड, मधुकर गायकवाड, सचिन पवार, निलेश गाडे, शांताबाई गायकवाड, विलास धाटावकर, रमेश धाटावकर, अमोल गायकवाड, आर्यन पवार, प्रवीण पवार, वरद धाटावकर, नयन गायकवाड, रितिक पवार, शुभम जाधव, सागर गायकवाड, निहाल गायकवाड, मंगेश गायकवाड, रोशन सकपाळ, जीवन जाधव, गणेश गायकवाड, गौरव गायकवाड, प्रकाश जाधव, दत्तात्रेय गायकवाड आदींच्या उपस्थितीत कार्यक्रम उत्साहात पार पडला.
![]()
























