नाव बदललं… पण धंदा थांबला नाही.. ब्ल्यू मुन विला लॉजमध्ये पुन्हा देहव्यापाराचा पर्दाफाश २०२४ मध्ये ‘ओयो शान’वर धाड; आता पुन्हा त्याच ठिकाणी पोलिसांची कारवाई, दोघांना अटक तर मुख्य आरोपी फरार
चेंढरे-गोंधळपाडा परिसरातील ब्ल्यू मुन विला लॉजमध्ये देहव्यापार सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईत उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे, याच ठिकाणी २०२४ मध्येही पोलिसांनी कारवाई केली होती. त्यावेळी लॉजचे नाव ‘ओयो शान’ होते. त्यानंतर नाव बदलण्यात आले; मात्र नाव बदलले तरी कथित गैरप्रकार पुन्हा सुरू असल्याचे पोलिसांच्या कारवाईत समोर आले आहे.
छावा डिजिटल न्यूज मीडिया सचिन मयेकर, अलिबाग ता.. ०९/०९/२६
चेंढरे-गोंधळपाडा परिसरातील एचपी पेट्रोल पंपाच्या मागील बाजूस असलेल्या ब्ल्यू मुन विला लॉजमध्ये देहव्यापार सुरू असल्याचा प्रकार स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईत उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे, याच ठिकाणी डिसेंबर २०२४ मध्येही पोलिसांनी कारवाई केली होती. त्यावेळी या लॉजचे नाव ‘ओयो शान’ होते. त्यानंतर लॉजचे नाव बदलण्यात आले; मात्र नाव बदलल्यानंतरही पुन्हा त्याच ठिकाणी देहव्यापार सुरू असल्याचे पोलिसांच्या कारवाईत समोर आले आहे.
स्थानिक गुन्हे शाखेला ब्ल्यू मुन विला लॉजमध्ये देहव्यापार सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी कारवाई केली असता दोन महिला आढळून आल्या. याप्रकरणी शैलेश प्रभाकर तांडेल, त्याची पत्नी आणि कृष्णा जानू ठाकूर यांच्याविरुद्ध अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यातील मुख्य आरोपी शैलेश प्रभाकर तांडेल हा फरार असून, त्याची पत्नी आणि कृष्णा जानू ठाकूर यांना ८ सप्टेंबर रोजी रात्री अटक करण्यात आली आहे. पोलिसांच्या आरोपानुसार, महिलांना देहव्यापारासाठी प्रवृत्त करून त्यांच्यासाठी ग्राहक उपलब्ध करून दिले जात होते. तसेच त्यांच्या कमाईवर उपजीविका केली जात असल्याचाही आरोप आहे.
२०२४ मध्ये धाड… नाव बदलले… तरी पुन्हा त्याच ठिकाणी कारवाई
या प्रकरणातील धक्कादायक बाब म्हणजे डिसेंबर २०२४ मध्ये याच ठिकाणी पोलिसांनी धाड टाकून कारवाई केली होती. त्यावेळी लॉजचे नाव ‘ओयो शान’ होते. त्या कारवाईत शैलेश प्रभाकर तांडेल आणि त्याच्या पत्नीसह तीन महिलांना अटक करण्यात आली होती. लॉजमध्ये ग्राहकांना महिलांचा पुरवठा केला जात असल्याचे त्यावेळी पोलिसांच्या कारवाईत समोर आले होते.
त्यानंतर लॉजचे नाव बदलण्यात आले. मात्र आता पुन्हा त्याच ठिकाणी देहव्यापाराचा प्रकार उघडकीस आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. नाव बदलल्यानंतरही कथित गैरप्रकार पुन्हा कसा सुरू झाला, याबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत.
याप्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, फरार मुख्य आरोपी शैलेश प्रभाकर तांडेल याचा शोध सुरू आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.
![]()

