कडक उन्हातही पोटासाठी जीवाची बाजी… सलाम या कष्टकऱ्यांना
छावा डिजिटल मीडिया – रेवदंडा — सचिन मयेकर — दिनांक : ०८ मे २०२६
रेवदंडा परिसरात दिवसेंदिवस उन्हाचा चटका वाढत चालला असून तापमानाने अक्षरशः कहर केला आहे. दुपारच्या वेळी बाजारपेठा ओस पडताना दिसत आहेत. नागरिक शक्यतो घराबाहेर पडणे टाळत आहेत. अंगातून घामाच्या धारा वाहत आहेत, उकाड्याने जीव हैराण झाला आहे. मात्र अशा कडक उन्हातही काही हात थांबत नाहीत… पोटाची खळगी भरण्यासाठी हे कामगार जीवाची पर्वा न करता भर दुपारी वेल्डिंग आणि लोखंडी स्ट्रक्चरचे काम करताना दिसत आहेत. अंगावर तळपता सूर्य, खाली उंचीचा धोका आणि मध्ये तापलेल्या लोखंडाचा सामना… तरीही चेहऱ्यावर काम पूर्ण करण्याची जिद्द.बाराच्या ठोक्याला रणरणत्या उन्हात सुरू असलेले हे काम पाहून प्रत्येकाने या कष्टकऱ्यांना सलाम करायलाच हवा. आपण सावली शोधतो, पण हे मात्र उन्हालाच साथीदार बनवून घाम गाळत जग उभं करतात. सलाम त्या मेहनतकऱ्यांना… सलाम त्या घामाला…
छावा कडून कष्टकऱ्यांना मानाचा मुजरा…
![]()

