
Category: महाराष्ट्र
‘सन्मान गमावून स्वार्थाचा विजय’
• संजय राऊत यांची तीव्र प्रतिक्रिया • चंद्रहार पाटील यांचा शिंदे गटात प्रवेश; ठाकरे गटातून संतापाची लाट • छावा • मुंबई, दि. १० • प्रतिनिधी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे सांगलीतील महत्त्वाचे नेते आणि कुस्ती क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व चंद्रहार पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना गटात प्रवेश केला. त्यांच्या या पक्षांतराने सांगलीतील राजकारणात…
कोकणातील बंदरविकासाच्या कामांना गती देण्याचे मत्स्यव्यवसाय मंत्र्यांचे निर्देश
• छावा • मुंबई, दि १० • प्रतिनिधी कारंजा, आनंदवाडी, मिरकरवाडा आणि ससून डॉक येथील बंदरांची विकासकामे गतीने आणि पारदर्शक पद्धतीने पूर्ण करण्याचे निर्देश मत्स्यव्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिले आहेत. मंत्रालयात पार पडलेल्या आढावा बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले. कोकणाच्या विकासासाठी ही बंदरे अत्यंत महत्त्वाची असून, या ठिकाणी चालू असलेल्या विकास प्रकल्पांमुळे…
पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांच्याकडून शहीद भगवान बिरसा मुंडा यांना अभिवादन
छावा • चंद्रपूर,दि. ९ जून | विशेष प्रतिनिधी शहीद दिनानिमित्त भगवान बिरसा मुंडा यांच्या पावन स्मृतीस राज्याचे आदिवासी विकास मंत्री आणि चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी अभिवादन करून त्यांना आदरांजली अर्पण केली. यावेळी त्यांनी बिरसा मुंडा यांच्या कार्यातून प्रेरणा घेण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमात आमदार किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी., मुख्य…
राज्यातील पहिली महसूल लोकअदालत पुणे जिल्ह्यात
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन छावा • पुणे, दि. ९ जून| प्रतिनिधी राज्यातील पहिली महसूल लोक अदालत पुणे जिल्ह्यात आयोजित करण्यात आली असून, याचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. या विशेष उपक्रमात महसूल विभागाच्या कार्यपद्धतीला नवसंजीवनी मिळणार असून, सामान्य नागरिकांच्या महसूलसंबंधित तक्रारींना जलद आणि न्याय्य तोडगा मिळणार असल्याचे उपमुख्यमंत्री पवार यांनी…
छत्रपती शिवाजी महाराज हे राष्ट्रनायक
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन ♦ दुर्गराज रायगडावर शिवछत्रपतींचा तिथीवत राज्याभिषेक सोहळा संपन्न छावा • महाड, दि. ०९ जून (ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी) | विशेष प्रतिनिधी “रायगड ही पवित्र भूमी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झाली आहे. जर शिवराज्याभिषेक झाला नसता तर आपण आज इथे नसतो. त्यांनी जात, पात, धर्म या सर्व भिंती मोडून ‘रयतेचे राज्य’ प्रस्थापित केले….
कोकणाच्या जलद विकासासाठी महामार्गांची उभारणी
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन छावा • माणगाव, दि. ९ जून | प्रतिनिधी “नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या कोकणाच्या जलदगतीने विकासासाठी रस्ते आणि महामार्गांची उभारणी अत्यंत गरजेची असून, प्रवासाचा कालावधी कमी करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे,” असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माणगाव येथे केले. माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाच्या मातोश्री गंगुबाई संभाजी शिंदे सीबीएसई शाळेच्या नव्या इमारतीच्या…
आपत्ती काळात माध्यमांना सत्य व अचूक माहिती द्यावी
अपर जिल्हाधिकारी अमृत नाटेकर यांच्या प्रशासनाला सूचना छावा • मुंबई | प्रतिनिधी “आपत्तीच्या काळात जनतेपर्यंत वस्तुनिष्ठ व सत्य माहिती पोहोचवणे ही अत्यंत गरजेची बाब असून, त्यासाठी जनसंपर्क अधिकाऱ्यांनी अधिक सजग राहून माध्यमांना सत्य घटनांची माहिती देण्याची जबाबदारी पार पाडावी,” असे आवाहन मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाचे अपर जिल्हाधिकारी अमृत नाटेकर यांनी केले. पावसाळ्यात उद्भवणाऱ्या संभाव्य आपत्ती…
शिवप्रेमींसाठी सुवर्णसंधी…..
छत्रपती शिवाजी महाराज गौरव सर्किटचा भव्य शुभारंभ शिवराज्याभिषेकदिनी प्रेरणादायी इतिहासयात्रेला सुरुवात छावा| मुंबई, दि. ९ | प्रतिनिधी भारतीय रेल्वेच्या भारत गौरव यात्रा अंतर्गत सुरु झालेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज गौरव सर्किट’ या विशेष रेल्वेचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून पार पडला. या ऐतिहासिक उपक्रमाचा प्रारंभ करताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी…
शाळांमधून स्टार्टअप संस्कृतीकडे वाटचाल
‘सक्षम’ ठरतोय परिवर्तनाचा मंत्र ♦ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची संकल्पना छावा | मुंबई, ९ जून | विशेष प्रतिनिधी राज्य शासनाच्या सहकार्याने उद्यम लर्निंग फाउंडेशन मार्फत नागपूर व अमरावती जिल्ह्यांतील शासकीय व अनुदानित शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये राबविण्यात आलेला ‘सक्षम’ उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये उद्यमशील मानसिकता विकसित करण्याच्या दिशेने एक प्रभावी पाऊल ठरला आहे. या कार्यक्रमाची संकल्पना मुख्यमंत्री…
…खऱ्या आखाड्यात उतरलो आहोत ..!
डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांचे प्रतिपादन शेकडो कार्यकर्त्यांसह हाती घेतला धनुष्यबाण छावा | मु. पो. ठाणे, दि.१० | प्रतिनिधी “आता नकली आखाडा सोडून खऱ्या आखाड्यात उतरलो आहोत,” असे ठाम वक्तव्य करत डबल महाराष्ट्र केसरी विजेते पैलवान चंद्रहार पाटील यांनी आज शेकडो समर्थकांसह शिवसेनेत अधिकृत प्रवेश केला. सांगली जिल्ह्यातील उबाठा गटाचे पदाधिकारी असलेले चंद्रहार…