
Category: महाराष्ट्र

लोकशाहीचे आधारस्तंभ…… संपादकीय
लोकशाहीचे आधारस्तंभ : राजश्री शाहू महाराज आज आपण राजश्री छत्रपती शाहू महाराजांची जयंती साजरी करत आहोत – एक असा युगपुरुष ज्यांनी केवळ एका संस्थानाचे राजे म्हणून नव्हे, तर एक पुरोगामी समाजसुधारक, लोकशाही मूल्यांचा खरा आधारस्तंभ म्हणून आपल्या विचारांनी आणि कृतीने भारतीय समाजाच्या भवितव्यास आकार दिला. अशा महान व्यक्तिमत्त्वाच्या कृतिउक्तीच्या प्रकाशात आजच्या समाजाचा आढावा घेऊया. •…

राज्याची कुपोषणमुक्तीकडे वाटचाल
• छावा, दि. २६ जून • मुंबई, प्रतिनिधी राज्यात कुपोषणमुक्तीसाठी विविध विभाग आणि यंत्रणांनी एकत्रितपणे राबवलेल्या उपाययोजनांना सकारात्मक प्रतिसाद मिळत असून, गेल्या दोन वर्षांत कुपोषित बालकांचे प्रमाण लक्षणीयरीत्या घटले आहे. अतितीव्र कुपोषण असलेल्या बालकांचे प्रमाण २०२३ मध्ये १.९३ टक्के होते, जे २०२५ मध्ये घटून ०.६१ टक्क्यांपर्यंत आले आहे. मध्यम कुपोषणाचे प्रमाणही ५.०९ टक्क्यांवरून ३.११ टक्क्यांवर…

आणीबाणीची पन्नास वर्षे…
• रायगड जिल्ह्यात संविधान हत्या दिवसानिमित्त छायाचित्र प्रदर्शन • लोकतंत्र सेनानींना मुख्यमंत्री स्वाक्षरीचे सन्मानपत्र प्रदान • छावा, दि. २६ जून • अलिबाग, प्रतिनिधी भारतातील आणीबाणीच्या ५० वर्षांच्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य सरकारच्या निर्देशानुसार ‘संविधान हत्या दिवस २०२५’ निमित्त रायगड जिल्हा प्रशासन व जिल्हा माहिती कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. या…

रेवदंड्यात मनसेच्या पाठपुराव्याला यश……
• कुंडलिकेतली बुडालेली बार्ज हटवण्याचे काम सुरू • प्रशांत वरसोलकर यांच्या पत्रानंतर प्रशासनाच्या कार्याला गती • छावा, दि. २५ जून • अलिबाग, विशेष प्रतिनिधी रेवदंडा पुलानजीक गेल्या अनेक वर्षांपासून समुद्रात अर्धवट बुडालेल्या आणि होड्यांच्या वाहतुकीसाठी धोकादायक ठरत असलेल्या जुन्या बार्ज हटविण्याची प्रक्रिया अखेर सुरू करण्यात आली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रेवदंडा शाखाध्यक्ष श्री. प्रशांत रामचंद्र…

ग्रामीण विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्याला हातभार
• लाईट ऑफ लाईफ ट्रस्टकडून शैक्षणिक साहित्य वाटप • बोर्ली, वळके, रामराज व बेलोशी येथील ४५५ लाभार्थी • छावा, दि. २५ जून • अलिबाग, विशेष प्रतिनिधी लाईट ऑफ लाईफ ट्रस्ट या सामाजिक संस्थेच्या अलिबाग विभागामार्फत दिनांक २१ आणि २२ जून २०२५ रोजी बोर्ली, वळके, रामराज आणि बेलोशी या चार केंद्रांमध्ये शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम आयोजित…

माय मराठीसाठी एकवटले शिलेदार
• “एक निर्धार, एक दिशा”चा उद्घोष • हिंदीसक्तीविरोधात राज्यस्तरीय मेळाव्यात ठाम भूमिका • छावा, दि. २३ जून • मुंबई, प्रतिनिधी “मराठी ही केवळ भाषा नसून अस्मिता, अर्थकारण आणि हक्कांचा मुद्दा आहे,” असा ठाम निर्धार घेऊन मराठी एकीकरण समितीचा राज्यस्तरीय “मराठी शिलेदार मेळावा” नुकताच प्रभादेवी, मुंबई येथे उत्साहात पार पडला. राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या मराठीप्रेमी नागरिक, कार्यकर्ते,…

मराठी….. संपादकीय
“मराठी : अभिजाततेचा श्वास, अस्मितेचा ध्वज” • छावा, संपादकीय | दि. २३ जून मराठी ही केवळ एक भाषा नाही, तर महाराष्ट्राच्या मनामनात वाहणारी एक जिवंत जाणीव आहे. तिने संतांची वाणी मांडली, शिवरायांचा शौर्यगाथा गातली, आणि सामान्य माणसाच्या दु:खदुःखात वाटेकरी झाली. आज आपण सर्वजण अभिमानाने म्हणतो – “माझी मराठी अभिमानास्पद आहे,” पण केवळ अभिमान पुरेसा नाही;…

ठाकरे बंधूंच्या युतीवर ‘देशपांडेंची’ छाया
• मनसे–ठाकरे गटाची समीकरणे बदलण्याच्या वाटेवर? • छावा • मुंबई, दि. २३ जून • विशेष प्रतिनिधी महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा ठाकरे विरुद्ध ठाकरे हे चित्र रंगत चालले आहे. एकीकडे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीच्या शक्यतेने कार्यकर्त्यांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले होते, तर दुसरीकडे मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्या सातत्यपूर्ण आक्रमक भूमिकेमुळे ही शक्यता…

रायगड जिल्ह्यात जमावबंदी आदेश
✦ कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रशासनाची कार्यवाही • छावा, दि. २४ जून • अलिबाग, विशेष प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील विविध औद्योगिक भागांमध्ये उद्भवणाऱ्या संभाव्य आंदोलनांमुळे तसेच आगामी धार्मिक सणांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी २४ जून २०२५ रोजी ००:०१ वाजल्यापासून ते ८ जुलै २०२५ रात्री २४:०० वाजेपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. हा…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कायदेशीर नोटीस
• हिंदी सक्तीवरून ७ दिवसांचे अल्टिमेटम • छावा • मुंबई, दि. २३ जून • वृत्तसंस्था त्रिभाषा धोरणाच्या अंमलबजावणीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली असून त्यांना ७ दिवसांचे अल्टिमेटम देण्यात आले आहे. प्रसिद्ध वकील असीम सरोदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही नोटीस बजावली असून फडणवीस यांच्या एका कथित “दिशाभूल करणाऱ्या” विधानावरून ही कारवाई…