Chhava News

महाअवतार नरसिंह – भक्तीचा शिखर, अत्याचाराचा अंत… आणि न्यायाची गर्जना! (ॲनिमेटेड चित्रपट समीक्षा)

छावा – रेवदंडा – सचिन मयेकर भारतीय पुराणातील सर्वात थरारक क्षण म्हणजे – स्तंभ फाडून गर्जणाऱ्या नरसिंहाचा अवतार! भक्त प्रल्हादाच्या निखळ श्रद्धेसमोर दैत्यराज हिरण्यकशिपूचा अहंकार चूर करणारा हा प्रसंग, महाअवतार नरसिंह या ॲनिमेटेड चित्रपटात इतक्या भव्यतेने साकारलाय की, पडद्यावरचा प्रत्येक फ्रेम जणू प्राण घेऊन उभी राहते. चित्रपटाची सुरुवात निरागस, परमेश्वरावर अढळ विश्वास असलेल्या प्रल्हादापासून होते….

Loading

Read More

चौल-सोंडेपार गावात थरारक घरफोडी

बंद घर फोडून मौल्यवान भांड्यांची चोरी – संपूर्ण गाव हादरले, पोलिसांची करडी नजर संशयितांवर. छावा – रेवदंडा,-सचिन मयेकर चौल-सोंडेपार गावातील शांत वातावरणाला एका घरफोडीने धक्का बसला आहे. गावातील एका जुन्या, बंद घराला अज्ञात चोरट्यांनी लक्ष्य करत ऐतिहासिक आणि भावनिक दृष्ट्या मौल्यवान तांब्या–पितळेच्या भांड्यांवर डल्ला मारला. फिर्यादी आरती अनंत काटवी यांच्या घरावर चोरट्यांची नजर होती. पाळत…

Loading

Read More

रेवदंड्यात रक्षाबंधनाचा उत्साह – बहिणींच्या ओवाळणीने उजाळला पवित्र सण

  रेवदंडा | ९ ऑगस्ट २०२५  छावा- रेवदंडा – सचिन मयेकर रेवदंडा गावात आज रक्षाबंधनाचा पवित्र सण पारंपरिक उत्साहात आणि भावनिक वातावरणात साजरा करण्यात आला. सकाळपासूनच गावातील घरोघरी बहिणीने आपल्या भावाला ओवाळून, राखी बांधून आणि गोडधोड भरवून हा अनमोल बंध अधिक घट्ट केला. विशेष म्हणजे, या उत्सवात चिमुकल्यांनीही मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. छोट्या बहिणींनी आपल्या…

Loading

Read More

ठाण्याचा ढाण्या वाघ… आणि रक्षाबंधनाला उमटणारी बहिणींची हजारोंची गर्दी.

राखीच्या प्रत्येक धाग्यात… आजही तो भाऊ जिवंत आहे रक्षाबंधन विशेष लेख – धर्मवीर आनंद दिघे साहेब दिनांक : ०९ ऑगस्ट २०२५ लेखक : छावा – रेवदंडा – सचिन मयेकर रक्षाबंधन म्हणजे केवळ एक सण नव्हे तो लाखो बहिणींसाठी एक आठवण असतो – एका ढाण्या वाघाच्या प्रेमाची, रक्षणाची आणि नात्याच्या वचनाची ठाणे, रायगड, अलिबाग, कोकण, मुंबई…

Loading

Read More

छापा… बनावट लेबलच्या आड दारूचा काळाबाजार! पोलादपूर तालुक्यात ६ लाखांचा गोवा बनावटीचा दारूसाठा जप्त – एक अटकेत, दोन फरार.

दिनांक – ८ ऑगस्ट २०२५  छावा – रायगड प्रतिनिधी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने पोलादपूर तालुक्यातील दिविल गावात मोठी कारवाई करत तब्बल ६ लाख १५ हजार रुपयांच्या विदेशी दारूचा साठा जप्त केला आहे. गोवा बनावटीच्या बनावट लेबल व बुच लावून विक्रीसाठी ठेवलेली ही दारू एका बंद घरातून आढळून आली. या कारवाईत रुपेश मोरे या…

Loading

Read More

दर्यात पुन्हा एकदा झोकून देणाऱ्या आशा…नारळीपौर्णिमेच्या शुभेच्छा.

  दिनांक : ८ ऑगस्ट २०२५  लेखक : सचिन मयेकर – छावा  नारळी पौर्णिमा… आजचा दिवस फक्त नारळ अर्पण करण्याचा नाही – तर आपल्या जिवाभावाच्या दर्याशी पुन्हा एक नवं नातं जोडण्याचा. रात्र सरतेय. लाटांचे आवाज झोपेच्या कवेत शिरलेत. पण एका छोट्याशा घरात अजूनही दिवा उजळतोय. कोळी नवरा-बायको बसलेत, थोड्या आशा, थोड्या चिंता आणि खूप प्रेम…

Loading

Read More

रेवदंडा पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात रूट मार्च

दिनांक: ७ ऑगस्ट २०२५ छावा – रेवदंडा ( सचिन मयेकर ) ग्रामस्थांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आणि कायदा-सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी आज रेवदंडा गावात रेवदंडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. श्रीकांत किरवले यांच्या नेतृत्वाखाली भव्य रूट मार्च (Foot Patrolling) पार पडले. या रूट मार्चमध्ये पोलीस उपनिरीक्षक श्री. म्हशीळकर, तसेच त्यांचे सहकारी सिद्धेश शिंदे, मनीष ठाकूर व इतर…

Loading

Read More

घडून गेलं आता पुरे – रेवदंडा बाजारपेठ व गोळा स्टॉपजवळ गतिरोधकांची जोरदार मागणी

दिनांक : [ छावा – सचिन ०७ ऑगस्ट २०२५ छावा – सचिन मयेकर] रेवदंडा गावातील मुख्य बाजारपेठेतील पारनाका ते आदर्श बँक परिसर, गोळा स्टॉप आणि रेवदंडा हायस्कूलजवळील मुख्य रस्ता या सर्व ठिकाणी वाहनांची मोठी वर्दळ असूनही अद्याप पर्यंत योग्य त्या सुरक्षितता उपाययोजना केल्या गेलेल्या नाहीत. परिणामी, या मार्गांवर वेगवान वाहने बेधडकपणे धावतात. विशेषतः एसटी बस…

Loading

Read More

दरोडेखोरांवर आंचल दलाल यांची धडक मोहीम – सहा जेरबंद, एक फरार

छावा- सुधागड,रायगड – सचिन मयेकर- ७ ऑगस्ट २०२५  रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यात दोन गावांवर सशस्त्र दरोडा टाकणाऱ्या टोळीचा पोलिस अधीक्षक आंचल दलाल यांच्या नेतृत्वाखाली धडक मोहिमेद्वारे पर्दाफाश करण्यात आला. सहा दरोडेखोरांना अटक करण्यात आली असून एक आरोपी अद्याप फरार आहे. २६ जुलैच्या रात्री हातोंड बौद्धवाडी आणि गोंदाव या दोन गावांमध्ये सहा-सात जणांच्या टोळक्याने थरकाप उडवणारा…

Loading

Read More

अलिबाग – रेवदंडा हमरस्त्यावर मोकाट कुत्र्यांची दहशत

छावा- रेवदंडा -सचिन मयेकर- ७ ऑगस्ट २०२५  अलिबाग ते रेवदंडा हमरस्त्यावर रात्रीच्या वेळेस मोकाट कुत्र्यांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. रात्री उशिरा प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना हे कुत्रे अचानक रस्त्यावर धाव घेत पाठलाग करतात, काही वेळा गाडीसमोर येऊन थेट अपघाताची परिस्थिती निर्माण करतात. यात काही दुचाकीस्वारांना जबर दुखापतीही झाल्याचे निदर्शनास आले आहे. विशेषतः ग्रामीण भागांत व…

Loading

Read More