गवतावर रक्ताचे नाही… पण विश्वासाचे डाग केतनच्या शेवटच्या झुंजीने फोडला सियाचा खोटेपणाचा बुरखा लोणावळा कडा केस ट्विस्ट आफ्टर ट्विस्ट
शेवटचा श्वास झुंजत झुंजत गेला
🟥 छावा डिजिटल | २५ जून २६ | सचिन मयेकर | लोणावळा
पोलीस पंचनाम्यात धक्कादायक खुलासा! कड्याच्या कडेला वाढलेल्या गवतात फक्त खुणा नाहीत… केतनच्या जगण्याची शेवटची झुंज आहे. एका धक्क्यात पडला हा प्लॅन फेल. त्याने स्वतःला सावरत आरोपींशी हातघाई केली. त्या फरफटलेल्या खुणा सांगताहेत मी सहजासहजी गेलो नाही.
सियाने आखलेला प्लॅन थरारक आहे. ट्रेकिंग प्रेमाची सफर असा विश्वास देऊन केतनला निर्जन कड्यावर नेलं. गोड बोलून, डोळ्यात स्वप्न दाखवून त्याला 100% बेसावध केलं. आणि नेमक्या त्याच क्षणी… मागून चेतन चौधरीचा हात केतनच्या पाठीवर!.पोलिसांचं ठाम मत त्या कड्यावरून पाय घसरण्याची शक्यता 1%. म्हणजे हे अपघात नाही, ही खूण आहे… विश्वासघाताची.
आरोपींनी कबुली दिली खरी, पण पोलिसांच्या हात अजून तांत्रिक पुरावे यायचे आहेत. मोबाईल डेटा, CCTV, फॉरेन्सिक रिपोर्ट… कोणता पुरावा सियाचा शेवटचा मास्क फाडणार?
![]()

