रेवदंडा पारनाका येथील बँक ऑफ बडोदा एटीएममधून पैसे निघत नसल्याने नागरिकांची गैरसोय
छावा डिजिटल न्यूज पोर्टल | महाराष्ट्र – सचिन मयेकर | दि. १६ जून २०२६
रेवदंडा पारनाका येथील Bank of Baroda शाखेच्या एटीएममधून काल संध्याकाळपासून पैसे निघत नसल्याची माहिती समोर आली आहे. एटीएममध्ये व्यवहार केल्यानंतर ग्राहकांना केवळ पावती मिळत असून रोख रक्कम मिळत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
या प्रकारामुळे स्थानिक ग्रामस्थांसह परिसरात आलेल्या पर्यटकांचीही गैरसोय होत आहे. एटीएममध्ये रोख रक्कम संपली आहे की तांत्रिक बिघाड झाला आहे, याबाबत अद्याप अधिकृत माहिती उपलब्ध झालेली नाही.
संबंधित बँक प्रशासनाने तातडीने दखल घेऊन एटीएम सेवा सुरळीत करावी, अशी मागणी ग्राहकांकडून करण्यात येत आहे.
![]()

