कोयता धमाका : सुडकोलीत मध्यरात्री कोयत्याचा वार जुन्या वादातून रक्तरंजित हल्ला
छावा डिजिटल मीडिया – रेवदंडा — सचिन मायरकर — दिनांक १३ मे २०२६
अलिबाग तालुक्यातील सुडकोली परिसर रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास रक्तरंजित घटनेने हादरून गेला. जुन्या भांडणाच्या रागातून एका व्यक्तीच्या डोक्यात थेट कोयत्याने वार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी नरेश गोकुळ तांबडकर (वय 47 रा . सुडकोली, अलिबाग) यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. आरोपी श्रीधर महादेव वावेकर (वय 51, रा. सुडकोली, अलिबाग) याने दि. 10 मे 2026 रोजी रात्री सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास जुन्या वादाच्या रागातून अचानक कोयत्याने हल्ला केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या हल्ल्यात फिर्यादीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याची माहिती समोर येत असून, घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. मध्यरात्री अचानक झालेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास हेड कॉन्स्टेबल मनीष ठाकूर करीत आहेत.
![]()

