पीएनपी कॉलेज आर्ट्स, कॉमर्स, सायन्स आणि कॉम्प्युटर सायन्सचा निकाल १०० टक्के अस्मी पटेल ८९.५० टक्के गुण मिळवून संस्थेत प्रथम
छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल – राजेश बाष्टे – अलिबाग – ०३ मे २०२६
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा निकाल जाहीर करण्यात आला. यामध्ये पीएनपी एज्युकेशन सोसायटीचा आर्ट्स, कॉमर्स, सायन्स व कॉम्प्युटर सायन्स वेश्वी गोंधळपाडा बारावीचा निकाल १०० टक्के लागला असून संस्थेमधून कॉम्प्युटर सायन्स मधील विद्यार्थिनी अस्मी हर्षल पटेल ८९.५० टक्के गुण मिळवून प्रथम, स्वरा अविनाश पाटील ८७.८३ टक्के गुण मिळवून द्वितीय तर सम्यक विनोद काळे ८६.१७ टक्के गुण मिळवून संस्थेत तृतीय आलेला आहे. आर्ट्स विभागाचा निकाल १०० टक्के, कॉमर्स विभागाचा निकाल १०० टक्के, सायन्स विभागाचा निकाल १०० टक्के, तर कॉम्प्युटर सायन्स विभागाचा निकाल सुद्धा १०० टक्के लागला आणि कॉलेजचा निकाल १०० टक्के लागला आहे. आर्ट्स मध्ये अक्षता सुरेश मोकल ८१.०० टक्के गुण मिळवून प्रथम, आर्या अमित पाटणकर ६८.३३ टक्के गुण मिळवून द्वितीय, पायल लक्ष्मण पाटील ६६.५० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली. कॉमर्स मध्ये निरजा पंकज म्हात्रे ७४.१७ टक्के गुण मिळवून प्रथम, श्रेयश रत्नाकर ठाकुर ७१.८३ टक्के गुण मिळवून द्वीतीय तर रिशिका मुकेश छेडा ७१.८३ टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली. सायन्स मध्ये स्वरा राहुल भगत ८१.५० टक्के गुण मिळवून प्रथम, अदिती राजेश डाकी ७७.१७ टक्के गुण मिळवून द्वीतीय तर ज्योतिर्मय प्राणिता बावणे ७६ टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेली आहे. तर कॉम्प्युटर सायन्समध्ये अस्मी हर्षल पटेल ८९.५० टक्के गुण मिळवून कॉलेज मध्ये व संस्थेत प्रथम, स्वरा अविनाश पाटील ८७.८३ टक्के गुण मिळवून कॉलेज व संस्थेत द्वितीय तर सम्यक विनोद काळे ८६.१७ टक्के गुण मिळवून कॉलेज व संस्थेत तृतीय आलेला आहे. सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष मा. आमदार भाई जयंत पाटील, खजिनदार नृपाल पाटील, कार्यवाह चित्रलेखा नृपाल पाटील, कॉलेजचे संचालक, संस्थेचे एच. आर. विक्रांत वार्डे, प्राचार्य रविंद्र पाटील, इतर प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आदींकडून अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
![]()

