महाराष्ट्र हादरला: ४ महिन्यात शेकडो बलात्कार, ९४ % केसेस पेंडिंग – नसरापूरच्या नराधमाला शिवशाहीचा दणका दया
छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल – सचिन मयेकर – ०३ मे २०२६
महाराष्ट्र दिनालाच स्वराज्याची माती रक्ताने भिजली भोर तालुक्यातील नसरापूर गावात चार वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून दगडाने ठेचून मारणाऱ्या ६५ वर्षीय भीमराव कांबळे या नराधमाने संपूर्ण महाराष्ट्राचा संताप अनावर केला आहे पण हा एकच केस नाही हे आहे महाराष्ट्राचं विदारक वास्तव १ मे रोजी दुपारी तीन वाजून बारा मिनिटांनी CCTV मध्ये आरोपी चिमुकलीला गोठ्यात नेताना कैद झाला अत्याचार करून दगडाने ठेचलं मृतदेह शेणात पुरला गावकऱ्यांनीच आरोपीला बनेश्वर फाट्यावर पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं कबुली दिली धक्कादायक म्हणजे हा नराधम १९९८आणि २०१५ मध्येही अशाच गुन्ह्यातून सुटला होता बंगळुरू हायवे रोको गाव कडकडीत बंद फास्ट ट्रॅक नको छावा ट्रॅकवर पंधरा दिवसांत न्याय द्या अशी मागणी गावकऱ्यांनी एल्गार करून केली आहे. एसपी संदीप सिंग गिल म्हणाले पंधरा दिवसांत दोषारोपपत्र दाखल करू.२०२६ च्या पहिल्या चार महिन्यांत महाराष्ट्राची लाजिरवाणी आकडेवारी ही एकटी नसरापूरची केस नाही महाराष्ट्रात लेकीबाळी किती असुरक्षित आहेत बघा पुणे शहर फेब्रुवारी ते ऑगस्ट २५ या सात महिन्यांत २६५ बलात्कार ४५० विनयभंग म्हणजे दर महिन्याला ३८ बलात्कार फक्त पुण्यात राज्यात प्रलंबित खटले २०१९ अखेर दोन लाख सात हजार महिलांवरील गुन्ह्यांचे खटले पेंडिंग म्हणजे ९४ टक्के केसेसना न्याय नाही महाराष्ट्रात ३३०७३ बाल लैंगिक अत्याचाराचे खटले प्रलंबित पुणे जिल्ह्यातच पाच हजार पेक्षा जास्त केसेस न्यायाच्या प्रतीक्षेत दोषसिद्धी किती NCRB नुसार महाराष्ट्रात फक्त सहा ते सात टक्के केसेसमध्ये शिक्षा होते ९३ टक्के आरोपी मोकाट ९९ पूर्णांक ५८ शतांश बलात्कार ओळखीच्या लोकांकडून होतात शेजारी नातेवाईक वॉचमन विश्वासघात.
शिवशाहीचा न्याय हवा असा जनतेचा उद्रेक… का नसरापूरकरांनी इतिहासाची आठवण करून दिली छत्रपती शिवाजी महाराजांनी गरीबाची सून पळवणाऱ्या पाटलाचे हात पाय कलम करून चौरंग बनवला होता गुन्हेगारांमध्ये दहशत होती आज तशीच दहशत निर्माण झाली पाहिजे. जनतेची मागणी काय छावा ट्रॅकवर खटला फास्ट ट्रॅक नको पंधरा दिवसांत निकाल निर्भया केसला बारा वर्षे लागली ते पुन्हा नको शिक्षा अशी द्या की महाराष्ट्राच्या प्रत्येक वेशीवर या नराधमाची चर्चा होईल. पळवाटा बंद करा यामध्ये दोन वेळा सुटलेल्या आरोपीला आता कायद्याचा कुठलाही फायदा मिळू नये. ग्रामस्थांनी महाराष्ट्र दिनी प्रश्न केला कसला महाराष्ट्र कसले राजे जिथे चिमुकली तीन वाजून बारा मिनिटांनी CCTV मध्ये जाताना दिसते आणि सहा वाजता शेणातून मृतदेह निघतो. सरकारला इशारा नसरापूरच्या नराधमाला जर फक्त फाशी झाली आणि लाखो प्रलंबित केसेस तशाच राहिल्या तर रयत पेटून उठेल न्याय फक्त कागदावर नको दहशत निर्माण करणारा हवा इतिहासाची पुनरावृत्ती जनतेचा सवाल प्रशासन जागं होणार का? एकेकाळी मुघल, ब्रिटिश, आदिलशाहीच्या काळात या भारतभूमीत लेकीबाळी दिवसा ढवळ्या सुरक्षित नव्हत्या परकीय आक्रमकांच्या टोळ्या गावं लुटायच्या अब्रूवर हात टाकायच्या शिवछत्रपतींनी आणि छावा संभाजी महाराजांनी स्वराज्य स्थापून रयतेला अभय दिलं स्त्रीकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्याचे हात कलम करण्याची दहशत निर्माण केली. पण आज स्वातंत्र्याच्या ७८ वर्षांनंतरही तीच परिस्थिती फरक एवढाच की परकीय आक्रमकांऐवजी आपल्याच मातीतले काही नराधम लांडगे तेच कृत्य करतायत. नसरापूरची चार वर्षांची चिमुकली असो पुण्यात दर महिन्याला होणारे ३८ बलात्कार असोत की दोन लाख प्रलंबित खटले असोत दिवसा ढवळ्या भरवस्तीत अत्याचार होतायत. मग सवाल हा आहे मुघल ब्रिटिशांच्या काळातलं जंगलराज संपवायला शिवछत्रपती जन्माला आले आजच्या या हैवानांना वेसण घालायला प्रशासन कधी जागं होणार? कायद्याच्या पुस्तकात शिक्षा आहेत पण दहशत नाही म्हणूनच १९९८ आणि २०१५ ला सुटलेला भीमराव कांबळे २०२६ ला पुन्हा चिमुकलीचा बळी घेतो. जनता विचारतेय राज्यकर्ते फक्त महाराष्ट्र दिनाला भाषणं देणार की छत्रपतींच्या स्वराज्यात होता तसा धाक निर्माण करणार ९४ टक्के केसेस पेंडिंग ठेवून निर्भयाला बारा वर्षे न्यायासाठी तडफडवून कोणत्या तोंडाने आम्ही स्वतंत्र भारत म्हणायचं ही बातमी जनभावना आणि अधिकृत आकडेवारीवर आधारित आहे कायदा हातात घेण्याचं आवाहन नाही तर जलद आणि कठोर न्यायाची मागणी आहे.
![]()

