रेवदंडा पोलीस स्टेशन हद्दीत भीषण अपघात रॉंग साईडचा बळी, एकाचा मृत्यू

छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल रेवदंडा ३० एप्रिल २०२६

          सचिन मयेकर          

रेवदंडा परिसरात बेफिकीर आणि निष्काळजी वाहनचालकामुळे झालेल्या भीषण अपघातात एका ज्येष्ठ व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
रेवदंडा पोलीस ठाण्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, मधुकर हरिभाऊ पाटील (वय 63, रा. मिठेखार, ता. मुरुड ) हे 28 एप्रिल 2026 रोजी रात्री आपल्या हीरो सुपर स्प्लेंडर (MH-06-AY-4049) या दुचाकीवरून चणेरा येथील आंब्याच्या बागेची पाहणी करून मिठेखारकडे परत येत होते.
दरम्यान, समोरून येणारा पवन रमेश चौधरी (रा. शिरगाव) हा होंडा शाईन (MH-06-7587) या दुचाकीवर तिघांना बसवून रॉंग साईडने आणि अतिवेगाने वाहन चालवत येत होता. निष्काळजीपणे वाहन चालवताना त्याने मधुकर पाटील यांच्या दुचाकीला समोरून जोरदार धडक दिली.
या भीषण धडकेत मधुकर पाटील गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी हलविण्यात आले; मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
या प्रकरणी प्रथमेश मधुकर पाटील यांनी रेवदंडा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून, पोलीस उपनिरीक्षक दीपक जानू म्हशीलकर पुढील तपास करत आहेत.
 गुन्हा रजिस्टर क्रमांक 56/2026 अंतर्गत
BNS कलम 106(1), 281, 125(a), 125(b) तसेच मोटार वाहन कायदा कलम 186, 125 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, अपघातातील आरोपी देखील जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
                 छावा विशेष संदेश:
रस्त्यावरची एक चूक, आयुष्यभराची शिक्षा ठरू शकते. रॉंग साईड, तिघे बसून प्रवास आणि वेगाचा अतिरेक ही बेफिकिरी जीवघेणी ठरते. नियम पाळा, स्वतःचा आणि इतरांचा जीव वाचवा.

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *