छावा fimfare एक मराठा… लाख मराठा दुःख, दंगल आणि मृत्यूवर मात करून उभा राहिलेला संतोष ‘भाई’ मोरे, भाग २

छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल रेवदंडा २४ एप्रिल २०२६
छावा Filmfare मध्ये संतोष मोरे यांच्या कहाणीचा पहिला भाग वाचल्यानंतर अनेकांच्या मनात आदर निर्माण झाला, पण त्यांच्या आयुष्यातील काही प्रसंग असे आहेत जे शब्दांत मावत नाहीत, हा भाग त्या वेदनांचा आहे जे त्यांनी जगले मुलगी मृणालचा वाढदिवस, घरात आनंदाचं वातावरण, कुटुंबाने ठरवलं अलिबागला जाऊ, फिरू, जेवू आणि दिवस साजरा करू, पण नियतीने वेगळंच काहीतरी लिहिलं होतं त्या दिवशी रात्री मेघा टॉकीजमध्ये सिनेमा पाहायचं ठरलं, तिकीट काढली,
सचिन मयेकर
पण अचानक दोन तिकीटांची गरज पडली, खिडकीवर विनंती केली, नकार आला, शब्दांची चकमक झाली, समोरच्याच्या उर्मट वागणुकीने धक्का दिला तो एक क्षण होता आणि सगळं बदललं स्वभाव जागा झाला, वातावरण तापलं, टॉकीजमध्ये गोंधळ उडाला, काचा फुटल्या, लोक पळू लागले, आनंदाचा दिवस दहशतीत बदलला, शेवटी पोलीस केस झाली पण ही फक्त एक घटना नव्हती, हा त्यांच्या आयुष्याचा एक चेहरा होता १६ डिसेंबर १९९२, मुंबई ग्रँट रोड, देशात तणाव, दंगलसदृश परिस्थिती, पण त्यांनी ठरवलं लग्न याच दिवशी करायचं, मुहूर्त बदलायचा नाही वऱ्हाड निघालं, रस्त्यात जळते टायर, अडवलेल्या गाड्या, भीतीचं सावट, प्रत्येक क्षणी धोका, पण भाई मागे हटले नाहीत, धक्काबुक्की करत पुढे गेले आणि त्या भयाच्या वातावरणातही लग्न पार पडलं आयुष्य पुढे सरकत राहिलं, चढउतार आले, पण भाई कधीच डगमगले नाहीत, कारण त्यांच्या रक्तातच जिद्द होती, एक मराठा लाख मराठा ही त्यांची ओळख होती, जावळीच्या मातीत वाढलेला हा माणूस शिवरायांच्या प्रेरणेने उभा राहिला होता पण आयुष्याने सर्वात मोठा आघात दिला आईचा विरह कोरोनाचा काळ होता, परिस्थिती भीतीची आणि अनिश्चिततेची होती, आणि त्या काळात त्यांच्या आयुष्यात सर्वात मोठं दुःख आलं आईच्या अंत्यसंस्काराला फक्त आठ माणसं उपस्थित होती, बाकी सगळीकडे शांतता होती, ज्या घरातून ते प्रत्येकाच्या दुःखात धावून जायचे, त्या घरासमोर आज कोणी नव्हतं तो क्षण शब्दांत मावणारा नव्हता, आई गेल्याचं दुःख एकीकडे आणि जगाने दूर राहिल्याचं दुःख दुसरीकडे आजही त्या आठवणींनी भाई व्याकुळ होतात कोरोनाच्या काळात अजून एक प्रसंग घडला, घरातील एक जिवलग नातेवाईक मुंबईत मृत्यूच्या दारात होता, परिस्थिती गंभीर होती त्या वेळी भाई पारनाका येथील शंकर मंदिरात गेले, दोन तास अखंड भक्तीत स्वतःला वाहून घेतलं, एकच प्रार्थना केली त्याला वाचव आणि जणू काही चमत्कार घडला, तो नातेवाईक पुन्हा आयुष्यात परतला ही श्रद्धा होती, हा विश्वास होता त्याचबरोबर भाई यांचा एक वेगळाच पैलू म्हणजे कुटुंबासाठी काहीही करणारा माणूस, गणपती विसर्जनाचा दिवस, घरचा अकरा दिवसांचा गणपती, अनंत चतुर्दशी, पण त्या वेळी त्यांची मुलगी आजारी होती आणि मायणी हॉस्पिटलमध्ये दाखल होती, डॉक्टरांनी डिस्चार्ज देण्यास नकार दिला होता पण मुलीची एकच इच्छा होती की विसर्जनाला जायचं एका बाजूला डॉक्टरांचा सल्ला आणि दुसऱ्या बाजूला मुलीचं मन, भाई यांनी डॉक्टरांना आदराने विनंती केली, परिस्थिती समजावून सांगितली, आणि शेवटी परवानगी मिळाली मुलीच्या चेहऱ्यावरचं समाधान पाहून भाई यांच्या डोळ्यात पाणी आलं हा फक्त विसर्जन नव्हता तर एका बापाच्या प्रेमाचा विजय होता आपण सहज एखाद्याविषयी बोलून मोकळे होतो, हा असा आहे तसा आहे म्हणतो, पण कधी विचार करत नाही की त्या माणसाने काय सहन केलं असेल प्रत्येकाच्या आयुष्याच्या मागे एक लढाई असते जी दिसत नाही पण तीच त्याला घडवते संतोष मोरे यांची कहाणी ही जिद्दीची, वेदनेची आणि पुन्हा उभं राहण्याची जिवंत साक्ष आहे
![]()

