समुद्रकिनारी आढळला महिलेचा मृतदेह अलिबाग हादरले

छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल अलिबाग २२ एप्रिल २०२६ 

            सचिन मयेकर            

अलिबाग येथील समुद्र किनाऱ्यावर आज एक अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास ही घटना येताच तात्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली.

घटनेची माहिती मिळताच अलिबाग पोलीस ठाणे चे पथक घटनास्थळी दाखल झाले असून मृतदेह ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. सदर महिलेची ओळख अद्याप पटलेली नाही.

प्राथमिक माहितीनुसार, मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून शवविच्छेदन अहवालानंतरच अधिक माहिती समोर येणार आहे.

दरम्यान, या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये विविध चर्चांना उधाण आले आहे.

ओळख पटविण्याचे आवाहन

सदर महिलेची ओळख कोणास असल्यास कृपया अलिबाग पोलीस ठाणे येथे तात्काळ संपर्क साधावा, असे पोलिसांकडून आवाहन करण्यात आले आहे.

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *