अलिबाग तालुक्यात शेतकरी ओळखपत्रासाठी विलंब; शासनाने तात्काळ कारवाई करावी देवव्रत पाटील यांची मागणी

छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल, बुधवार ०१ एप्रिल २०२६

 अलिबाग तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांनी गेल्या ८ ते ९ महिन्यांपासून शेतकरी ओळखपत्र (Farmer ID) साठी ऑनलाइन अर्ज केले असूनही त्यावर अद्याप कार्यवाही झालेली नाही. तहसिलदार कार्यालयातील विलंबामुळे शेतकऱ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यास मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

शेतकरी ओळखपत्र हे पीक विमा, नुकसान भरपाई, कृषी कर्ज, कर्जमाफी तसेच प्रधानमंत्री किसान सन्मान निधी यांसारख्या योजनांसाठी अत्यावश्यक दस्तऐवज बनले आहे. विशेषतः २०२५ मधील अतिवृष्टी व नैसर्गिक आपत्तींमुळे झालेल्या नुकसानीच्या भरपाईसाठीही या ओळखपत्राची आवश्यकता भासली. मात्र, Farmer ID न मिळाल्यामुळे अनेक शेतकरी लाभापासून वंचित राहिल्याचे समोर आले आहे.

यासंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शॅडो कॅबिनेट सदस्य तथा माहिती अधिकार संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष देवव्रत विष्णू पाटील यांनी शासनाकडे तक्रार सादर केली आहे. त्यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, “शेतकरी वारंवार तलाठी व तहसिल कार्यालयात फेऱ्या मारत आहेत, मात्र अर्ज प्रक्रिया पूर्ण होत नसल्यामुळे त्यांना मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे.”

           राजेश बाष्टे — अलिबाग     

शेतकरी ओळखपत्रासाठी AgriStack Farmer Registry (mhfr.agristack.gov.in) या पोर्टलवर अर्ज नोंदणी केली जाते. तथापि, अर्ज मंजुरी आणि प्रमाणीकरण प्रक्रियेत होणारा विलंब हा गंभीर प्रश्न बनला असून राज्यातील इतर भागांतूनही अशा तक्रारी येत आहेत.

देवव्रत पाटील यांनी शासनाकडे मागणी केली आहे की, अलिबाग तालुक्यातील सर्व प्रलंबित अर्ज तातडीने निकाली काढून शेतकऱ्यांना Farmer ID वितरित करण्यात यावा. तसेच कामात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी.

शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रशासनाने तत्काळ पावले उचलून प्रक्रिया गतीमान करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

📞 संपर्कासाठी :

देवव्रत विष्णू पाटील

१०३, ‘जी’ विंग, जमनानगर, पो. पोयनाड, ता. अलिबाग

मो. ८९८३०९४७०५

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *