अलिबागचा ‘खरा हिरो’ रिक्षाचालकाने ३८ हजारांसह पाकीट परत करून जिंकली माणुसकीची बाजी
आजच्या स्वार्थी जगात जिथे पैशासाठी नातेसंबंधही तुटतात, तिथे अलिबागमधील एका साध्या रिक्षाचालकाने प्रामाणिकपणाचा असा आदर्श घालून दिला की, सगळ्यांनीच त्याला सलाम ठोकावा!
प्राजक्ता नाका रिक्षा स्टँडवर कार्यरत असलेले आशीर्वाद यशवंत पाटील (रा. मुळे, अलिबाग) यांनी “माणुसकी अजून जिवंत आहे” हे कृतीतून दाखवून दिलं.
दि. २७ मार्च रोजी नागांव येथून प्रवासी सोडून परत येत असताना रायवाडी–नागांव मार्गावर त्यांना एक पाकीट सापडलं. साधा माणूस असता तर कदाचित दुर्लक्ष केलं असतं किंवा मोहाला बळी पडला असता… पण पाटील यांनी वेगळीच वाट निवडली!
पाकिटाची तपासणी केली असता त्यामध्ये तब्बल ₹३८ हजारांची रोख रक्कम, मतदार ओळखपत्र आणि महत्त्वाची कागदपत्रे आढळली. त्यांनी सोशल मीडियाचा वापर करून मालकाचा शोध घेतला आणि अखेर मुंबईतील सांताक्रूझ येथे राहणारे शिरीष सिनकर यांच्याशी संपर्क साधला.
👉 दुसऱ्याच दिवशी, २८ मार्च रोजी त्यांनी स्वतःहून ते पाकीट सुरक्षितपणे परत केलं!
पाकीट परत मिळाल्यानंतर सिनकर दांपत्य भारावून गेले. त्यांनी पाटील यांचा मिठाई व बक्षीस देऊन सन्मान केला. मात्र खरी कमाई पैशात नव्हती… तर होती “विश्वासाची”!
💬 आजच्या काळात अशी माणसं दुर्मिळच…
महागाई, स्पर्धा आणि धावपळीच्या युगात, जिथे प्रत्येक जण स्वतःसाठी धावत आहे, तिथे आशीर्वाद पाटील यांच्यासारखे लोक समाजाला माणुसकीची आठवण करून देतात.
👉 “प्रामाणिकपणा अजून जिवंत आहे” — याचं जिवंत उदाहरण म्हणजे अलिबागचा हा रिक्षाचालक!
![]()

