अळीपासून फुलपाखरापर्यंतचा प्रवास! जिंदाल विद्या मंदिर, साळाव येथे लहानग्यांचा भव्य Convocation सोहळा उत्साहात

छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल ✍ सचिन मयेकर, साळाव ,शनिवार २८ मार्च २०२६

जिंदाल विद्या मंदिर, साळाव येथे Convocation Ceremony 2025-26 मोठ्या उत्साहात आणि जल्लोषपूर्ण वातावरणात पार पडली. यावर्षी कार्यक्रमाची संकल्पना “Mission Complete Caterpillars to Butterflies” अशी प्रेरणादायी ठेवण्यात आली होती. UKG मधील विद्यार्थ्यांचा प्री-प्रायमरीतून प्रायमरीकडे होणारा प्रवास या संकल्पनेतून अत्यंत भावनिक आणि आकर्षक पद्धतीने सादर करण्यात आला.

कार्यक्रमाला शाळेचे प्रिन्सिपल मुकेश ठाकूर, व्हाईस प्रिन्सिपल मंगेश बामनोटे तसेच प्रमुख पाहुण्या निलू मल्लिक यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी अनिता मॅडम, सविता जॉय, एलिझाबेथ झिना मॅम, मीना मॅडम, अनघा घरत मॅडम, मुस्कान हलडे, मार्गलीट चौलकर, निशी मॅम, जामकर मॅम, ढगे सर, दुबे सर आदी शिक्षकांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली.

कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या गाणी व नृत्यांच्या मनमोहक सादरीकरणांनी उपस्थितांची मने जिंकली. पालकांनीही आपल्या चिमुकल्यांच्या कामगिरीचे कौतुक करत आनंद व्यक्त केला.

यावेळी प्रमुख पाहुण्या निलू मल्लिक यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की,

“प्रत्येक विषयासाठी वेगवेगळे शिक्षक असतात. मुलांनी फक्त आवडत्या शिक्षकांपुरते मर्यादित न राहता सर्व शिक्षकांचा आदर करावा. पालकांनी मुलांना समजावून सांगावे की प्रत्येक शिक्षक खूप मेहनत घेतो आणि सर्व शिक्षक चांगलेच असतात  जसे आई-वडील असतात तसेच.”त्या पुढे म्हणाल्या,

“मुलं ही कोरी पाटी असतात. त्यावर आपण जे लिहितो तेच त्यांच्या आयुष्यात उमटतं. त्यामुळे लहानपणापासून चांगले संस्कार देणे अत्यंत महत्त्वाचे आहे.”लहानग्यांना उद्देशून त्यांनी सांगितले,“तुम्ही आता 1st class मध्ये जाणार आहात. नवीन गोष्टी शिकाल, नवीन मित्र बनवाल. तुमच्या वस्तू जपून ठेवा, दररोज आत्मविश्वास वाढवा आणि मैत्री अधिक घट्ट करा.”याच वेळी मुख्याध्यापक मुकेश ठाकूर यांनी पालकांना मार्गदर्शन करताना महत्त्वपूर्ण मुद्दे मांडले. ते म्हणाले,“पालकांनी फक्त ‘माझं मूल कसं आहे?’ एवढंच विचारू नये, तर योग्य प्रश्न विचारले पाहिजेत.”ते पुढे म्हणाले,“तुमचं मूल वर्गात शिक्षकांचं नीट ऐकतं का? शिक्षकांच्या सूचना पाळतं का? इतर मुलांशी कसं वागते? वर्गात इंग्रजी बोलण्याचा प्रयत्न करतं का? शाळेतील इतर उपक्रमांमध्ये सहभागी होतं का? असे प्रश्न वर्गशिक्षकांना जरूर विचारा.”

त्यांनी स्पष्ट केले की, “अशा प्रश्नांमुळे मुलांच्या सर्वांगीण विकासाची खरी माहिती मिळते आणि त्यांना योग्य दिशा देता येते.”

कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या आणि त्यांच्या उज्ज्वल भवितव्याची कामना व्यक्त करण्यात आली.

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *