वेगाचा बळी साळाव पुलावर भीषण अपघात ४१ वर्षीय सायकलस्वार ठार

छावा डिजिटल न्यूज पोर्टल | सचिन मयेकर | दि. ०५ जून २०२६

साळाव पुलावर शुक्रवारी रात्री झालेल्या भयंकर अपघातात एका सायकलस्वाराचा मृत्यू झाला. भरधाव वेगाने आलेल्या मोटारसायकलने मागून जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला. मिळालेल्या माहितीनुसार, गणेश मिणमिणे (वय ४१, रा. साळाव) हे सायकलवरून जात असताना रेवदंडा बाजूकडून साळावच्या दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या मोटारसायकलने त्यांना मागून जोरदार धडक दिली. हा अपघात शुक्रवारी रात्रीच्या सुमारास साळाव पुलावर झाला.धडक इतकी भीषण होती की या अपघातात मिणमिणे गंभीर जखमी झाले. अपघातानंतर त्यांना तातडीने अलिबाग शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले. निडी येथील २६ वर्षीय मोटारसायकलस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दुर्घटनेमुळे साळाव परिसरात हळहळ व्यक्त होत असून, भरधाव वाहनांवर नियंत्रण ठेवण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दिपक म्हशीलकर करीत आहेत.

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *