जिल्हा परिषद सदस्य सचिन राऊळ यांच्या कन्येचे दैदिप्यमान यश

छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल,नागाव १८ एप्रिल २०२६ 

             सचिन मयेकर             

नागाव येथील पीएनपी सायन्स विद्यालयातील कु. सिया सचिन राऊळ हिने इयत्ता दहावी (सीबीएसई) परीक्षा २०२६ मध्ये ९०.६० टक्के गुण मिळवत संस्थेत प्रथम क्रमांक पटकावला आहे.

विशेष म्हणजे, कु. सिया या जिल्हा परिषद सदस्य सचिन राऊळ यांच्या कन्या असून, शिक्षणासोबतच कुटुंबाच्या सामाजिक कार्याची परंपरा जपत त्यांनी हे उज्ज्वल यश संपादन केले आहे.

या यशामुळे नागाव परिसरासह संपूर्ण रायगड जिल्ह्याचा मान उंचावला आहे. तिच्या मेहनतीला, चिकाटीला तसेच पालक व शिक्षकांच्या मार्गदर्शनाला हे यश समर्पित आहे.

 पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी छावा परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *