अलिबागच्या साराची बँकॉकला झेप AOSI स्विमिंग चॅम्पियनशिप २०२६ साठी सारा अभिजीत वर्तकची निवड चिऊ ताईंच्या हस्ते सत्कार

छावा डिजिटल न्युज मीडिया अलिबाग | सचिन मयेकर

अलिबाग तालुक्यातील फोफेरी येथील युवा जलतरणपटू सारा अभिजीत वर्तक हिने आपल्या मेहनतीच्या, जिद्दीच्या आणि सातत्यपूर्ण सरावाच्या जोरावर आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठी झेप घेतली आहे. बँकॉक येथे होणाऱ्या AOSI स्विमिंग चॅम्पियनशिप २०२६ स्पर्धेसाठी साराची निवड झाली असून, तिच्या या यशामुळे फोफेरीसह अलिबाग आणि रायगडमध्ये अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

साराची महाराष्ट्र ॲक्वाटिक इंडिया संघात निवड झाल्याबद्दल तिचा शेतकरी कामगार पक्षाच्या राज्यप्रवक्ता सौं.चित्रलेखा नृपाल पाटील (चिऊ ताई) यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी चिऊ ताईंनी साराच्या मेहनतीचे आणि जिद्दीचे कौतुक करत तिला आगामी आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या तसेच पुढील वाटचालीसाठी प्रोत्साहन दिले.

खुल्या जलस्रोतातील जलतरणात साराची चमक

सारा अभिजीत वर्तक ही ओपन-वॉटर अर्थात खुल्या जलस्रोतांतील जलतरण प्रकारातील आश्वासक युवा खेळाडू म्हणून पुढे येत आहे. सातत्यपूर्ण सराव, कठोर मेहनत आणि आत्मविश्वासाच्या जोरावर तिने जलतरण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

तिच्या या प्रवासात कुटुंबीयांचे तसेच प्रशिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले आहे. आता देशाबाहेर होणाऱ्या या महत्त्वाच्या स्पर्धेत आपल्या कौशल्याची छाप पाडण्याची संधी साराला मिळाली आहे.

फोफेरी ते बँकॉक… स्वप्न मोठे, लक्ष्य भारताचे

फोफेरीसारख्या ग्रामीण भागातून जलतरणाच्या क्षेत्रात पुढे येत आंतरराष्ट्रीय स्पर्धेपर्यंत मजल मारणारी सारा ही रायगडमधील अनेक होतकरू खेळाडूंसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

साराच्या या मोठ्या यशाबद्दल शे.का.प. महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील (चिऊ ताई) यांनी तिचे अभिनंदन करत, बँकॉक येथे होणाऱ्या स्पर्धेत उत्तम कामगिरी करून महाराष्ट्रासह भारताचे नाव उज्ज्वल करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी साराचे वडील अभिजित वर्तक, शेकाप नेते अनिल पाटील, दिलीप गावंड यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

साराच्या जिद्दीला सलाम

आता लक्ष्य बँकॉकचे… आणि स्वप्न भारताच्या विजयाचे सारा अभिजीत वर्तक हिला आगामी AOSI स्विमिंग चॅम्पियनशिप २०२६ साठी मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *