
Category: महाराष्ट्र

गुरु-ता-गद्दी व शाहिदी शताब्दी समागम
• मुख्यमंत्र्यांकडून समागमाच्या यशासाठी संपूर्ण सहकार्याची ग्वाही • राज्यस्तरीय समितीची वर्षा निवासस्थानी बैठक • छावा • मुंबई, दि १३ जून • प्रतिनिधी गुरु तेग बहादूर साहेबजी यांच्या ३५० व्या शाहिदी वर्षानिमित्त आणि श्री गुरु गोविंदसिंहजी यांच्या ३५० व्या गुरु-ता-गद्दी समागमाच्या निमित्ताने राज्यात तीन ठिकाणी भव्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. नांदेड, नागपूर व नवी मुंबई…
विमान कोसळलं, त्याच इमारतीत झोपली होती, अकोल्याच्या तरुणीचा कसा वाचला जीव? थरारक कहाणी समोर
छावा • अहमदाबाद,ता. १३ जून • प्रतिनिधी अहमदाबादमधील भीषण विमान अपघातात अकोल्याची विद्यार्थिनी ऐश्वर्या तोष्णीवाल थोडक्यात बचावली. मेडिकल कॉलेज हॉस्टेलमध्ये झोपलेली असताना विमानाचा आवाज ऐकून ती जागी झाली आणि धुरातून सुरक्षित बाहेर पडली.गुजरातच्या अहमदाबादमध्ये गुरुवारी (१२ जून २०२५) भीषण विमान अपघात झाला. या विमान अपघातामुळे एकच खळबळ उडाली. या दुर्घटनेत एअर इंडियाचं विमान (एआय १७१)…

रेवदंडा अपघात
• दूध सोसायटी व शिधा केंद्र संरचनेचे नुकसान • मध्यरात्री वाहनाची धडक ; चालक पसार • छावा • रेवदंडा, ता. १३ जून • प्रतिनिधी रेवदंडा येथील सहकारी दूध तथा शासकीय शिधा वाटप केंद्राच्या इमारतीस मध्यरात्रीच्या सुमारास एका अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. सदर घटनेनंतर वाहन चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. सदर अपघातामध्ये इमारतीच्या बाहेरील भिंतीचे…

AI-171 विमान अपघात
• राज्य शासनाचा मदत कक्ष सक्रिय • छावा • मुंबई, दि. १२ जून • प्रतिनिधी अहमदाबादहून लंडनकडे जाणाऱ्या एअर इंडिया AI १७१ या आंतरराष्ट्रीय विमानाचा गंभीर अपघात झाल्याने देशभरात खळबळ उडाली आहे. या दुर्घटनेत किती प्रवासी जखमी झाले किंवा हताहत झाले याबाबत तपशील समोर येत असतानाच, प्रशासकीय स्तरावर तात्काळ कृती आणि मदतीसाठी हालचाली सुरू झाल्या…

प्रेम, पवित्रता आणि पोकळपणा…. संपादकीय
“प्रेम, पवित्रता आणि पोकळपणा : समाजाच्या नैतिकतेचा काळा आरसा” • छावा, संपादकीय | दि. १३ जून २०२५ गेल्या काही महिन्यांत देशभरात, विशेषतः महाराष्ट्रात, घडलेल्या काही घटनांनी समाजाच्या मूल्यव्यवस्थेला जबरदस्त हादरा दिला आहे. लग्नानंतर अवघ्या १७ दिवसांत नवऱ्याचा खून करणारी पत्नी, विवाहबाह्य प्रेमसंबंधातून प्रियकराच्या मदतीने पतीचा जीव घेणाऱ्या पत्नी, आणि एकीकडे प्रेमाच्या नाट्यावर उभारलेली कुटुंबव्यवस्था—या सर्व…

झोपडपट्टी पुनर्वसनाला गती
• डोंगर उतारांवरील झोपड्यांसाठी स्वतंत्र धोरणाचा निर्णय • मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झोपुप्राची उच्चस्तरीय आढावा बैठक संपन्न • छावा • मुंबई, दि. १२ जून • वृत्तसंस्था राज्यातील झोपडपट्ट्यांच्या पुनर्वसनाच्या कार्यास गती देण्यासाठी आणि धोरण अधिक परिणामकारक करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (झोपुप्रा) संदर्भात उच्चस्तरीय आढावा बैठक घेतली. या बैठकीस उपमुख्यमंत्री…

तृतीयपंथीय हक्कांसाठी राज्य शासन कटिबद्ध
संरक्षण व कल्याण मंडळाला दिले सक्रिय रूप • छावा • मुंबई, दि. १२ जून • वृत्तसंस्था तृतीयपंथीयांच्या हक्कांचे रक्षण आणि त्यांच्या कल्याणासाठी महाराष्ट्र शासन सकारात्मक असून, या समुदायाच्या विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी “महाराष्ट्र राज्य तृतीयपंथीय हक्कांचे संरक्षण आणि कल्याण मंडळ” स्थापन करण्यात आले आहे. या मंडळाच्या सदस्यांना बैठका आणि प्रवासासाठी मानधन देण्यात येईल, अशी माहिती सामाजिक…

मुंबई मनपा निवडणूक की नवे समीकरण…?
• उबाठा गटाचे भाजपवर फोडाफोडीचा आरोप • मनसेच्या रणनीतीकडे लक्ष • छावा • मुंबई, दि. १२ जून • प्रतिनिधी मुंबईतील वांद्रे येथील ताज लँड्स एंड हॉटेलमध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात नुकतीच झालेली गुप्त बैठक सध्या महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात चर्चेचा मुख्य विषय ठरली आहे. ही बैठक जवळपास एक…

विद्यार्थी प्रवेशोत्सव : संपादकीय
“शाळा उघडली… पण शिक्षणाची दारे सर्वांसाठी खुली झाली का?” • छावा, संपादकीय | १२ जून २०२५ १६ जूनला शाळांचे दरवाजे उघडणार आहेत, रंगीत तोरणांनी सजवलेले प्रवेशद्वार, फुगे, रांगोळ्या, प्रभातफेरी, आणि विद्यार्थ्यांचे आनंदात स्वागत. वर्षानुवर्षे सरावलेल्या या पारंपरिक उत्सवामध्ये यंदाही शासकीय योजनांची यथाशक्ती अंमलबजावणी होणार, आणि जिल्ह्यातून नव्हे तर राज्यातून ‘शाळाबाह्य एकही बालक नको’ हा निर्धार…
भडगावमध्ये नव्या राजकीय पर्वाची नांदी
• उबाठा गटाच्या समीकरणांना सुरुंग • स्थानिक स्वराज्य निवडणुकांपूर्वी निष्ठावानांच्या हाती शिवबंधन • छावा • जळगाव, दि. ११ जून • प्रतिनिधी महाराष्ट्राच्या राजकीय पटावर सध्या वेगाने बदलते चित्र पाहायला मिळत आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची पार्श्वभूमी आणि २०२४ नंतरच्या विधानसभेच्या संभाव्य राजकीय फेरफटक्याच्या पार्श्वभूमीवर, विविध भागांतील नेत्यांचा पक्षांतराचा ओघ अधिकच गती घेताना दिसत आहे….