
Category: महाराष्ट्र

स्वच्छतेचा संन्यासी – सुरेंद्र गोंधळी यांचं नि:स्वार्थ कार्य.
छावा -मराठी- सचिन मयेकर – रेवदंडा दि. १८/०८/२०२५ रेवदंडा हे केवळ समुद्रकिनारा, किल्ला किंवा इतिहासापुरतं मर्यादित गाव नाही. इथं अजून एक गोष्ट आहे – माणुसकीचं मंदिर! आणि त्या मंदिरात नतमस्तक राहून, कोणतीही अपेक्षा न ठेवता, आपली सेवा देणारे – सुरेंद्र गोंधळी! कोणत्याही राजकीय पदावर नाहीत, कोणत्याही संस्थेचे पदाधिकारी नाहीत, पण गावातील अनेकांना त्यांच्या कार्यामुळे ते…

अलिबाग तालुक्यातील रस्त्यांची दैनावस्था – जनता त्रस्त
१८ ऑगस्ट २०२५ सचिन मयेकर – छावा न्यूज पोर्टल पोयनाड, पेझारी, बेलकडे–पाल्हे बायपास, कुरूळचें जवळील रस्ता, चौल नाक्यावरील रस्ता आणि नागाव–रेवदंडा मार्गावर तसेच तालुक्यात ठिकठिकाणी खड्ड्यांचा कहर! बेलकडे–पाल्हे बायपास, कुरूळचें जवळील रस्ता, चौल नाक्यावरील रस्ता आणि नागाव–रेवदंडा मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य जनता संतप्त: “अपना काम बनता, भाड में जाये जनता अशा कडक प्रतिक्रिया जनतेने दिल्या आहेत….

अलिबाग कोळीवाड्यात ६५ वर्षांची परंपरा कायम – २७ फूट मल्लखांब सज्ज, २६ नंबरच्या गोविंदाने ६:५४ वाजता दहीहंडी फोडत जल्लोष, पत्रकार सचिन मयेकरांचा गौरव”
दिनांक : १६ ऑगस्ट २०२५ सचिन मयेकर – छावा न्यूज पोर्टल-अलिबाग अलिबाग कोळीवाड्यातील थरारक मल्लखांब दहीहंडी उत्सव अलिबाग शहरातील महादेव कोळी समाजतर्फे आयोजित पारंपरिक मल्लखांब दहीहंडी उत्सव यंदाही प्रचंड जल्लोषात साजरा करण्यात आला. तब्बल ६५ वर्षांची परंपरा असलेला हा अद्वितीय उत्सव आज अलिबागच्या जुने मच्छी मार्केट कोळीवाडा येथे रंगला. परंपरेला मान सुमारे ६६ गोविंदा या…

अलिबाग तुंबापुरी! मुसळधार पावसाने शहर ठप्प
दिनांक : १६ ऑगस्ट २०२५ लेखक : सचिन मयेकर – छावा न्यूज पोर्टल गेल्या दोन दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे अलिबाग शहर अक्षरशः ‘तुंबापुरी’ झाले आहे. रस्त्यांवर गाड्या पाण्यात गटांगळ्या खाताना दिसत आहेत. चारचाकी वाहनांचे दरवाज्यापर्यंत पाणी पोहोचल्याने वाहनधारकांची पंचाईत झाली. पाण्यातून गाड्या जाताना लाटांसारख्या लाटा उठत होत्या, जणू काही समुद्राच्याच लाटा शहरात उसळत आहेत, असे…

आज गोकुळात नंदलाल श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव
दिनांक : १६ ऑगस्ट २०२५ लेखक : सचिन मयेकर – छावा न्यूज पोर्टल आज संपूर्ण देशभर विशेषतः महाराष्ट्रात भक्तिभाव आनंद आणि उत्साहाने श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी होत आहे मध्यरात्री बारा वाजता मंदिरांमध्ये शंखनाद घंटानाद भजन कीर्तनाच्या लहरींनी वातावरण भारून जाईल नंद घर आनंद भयोचा गजर होईल आणि फुलांच्या आरासात चांदी सोन्याच्या पाळण्यात बाळकृष्ण विसावतील जन्माष्टमी म्हणजे…

९०व्या वर्षीही सेवेची अखंड ज्योत — डॉक्टर सुरेश गोरेगावकर यांच्या हस्ते रेवदंडा मारुती आळी शाळेत ध्वजारोहण
दिनांक : १५ ऑगस्ट २०२५ रेवदंडा – सचिन मयेकर – छावा न्यूज पोर्टल रेवदंडा मारुती आळी येथील रायगड जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत आज स्वातंत्र्यदिनाचा ध्वज एका अनोख्या मान्यवराच्या हस्ते फडकला. रेवदंडातील ज्येष्ठ वैद्यकीय सेवेतील दीपस्तंभ, डॉ. सुरेश शांताराम गोरेगावकर वयाच्या तब्बल ९० व्या वर्षीही रुग्णसेवा सुरू ठेवणारे यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा मान मिळाला. डॉ. गोरेगावकर…

रेवदंडा पागार मोहल्ल्यात भावूक क्षण — माजी सरपंच जुलेखा तांडेल यांच्या हस्ते ध्वजारोहण
दिनांक : १५ ऑगस्ट २०२५ रेवदंडा – सचिन मयेकर – छावा न्यूज पोर्टल रेवदंडा पागार मोहल्ला येथील रायगड जिल्हा परिषद उर्दू शाळेत स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित ध्वजारोहणाचा मान यंदा माजी सरपंच सौ. जुलेखा अब्बास तांडेल यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी वातावरण भावनिक झाले. सुमारे ३० वर्षांपूर्वी रेवदंडा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी कार्यरत असलेल्या सौ. जुलेखा तांडेल यांनी…

पोलिसांच्या पोशाखातला ‘लहानसा शूरवीर’ – ध्वजारोहण सोहळ्याचा आकर्षणबिंदू.
दिनांक : १५ ऑगस्ट २०२५ रेवदंडा – सचिन मयेकर – छावा न्यूज पोर्टल स्वातंत्र्य दिनाचा तो मंगलमय क्षण… रायगड जिल्हा परिषदेच्या उर्दू शाळा, पागार मोहल्ला येथे तिरंग्याचा मानाचा झेंडा फडकत होता. देशभक्तीच्या गीतांनी वातावरण भारावले होते. या दरम्यान सर्वांचे लक्ष वेधून घेणारा एक वेगळाच पाहुणा उपस्थित होता पोलिस इन्स्पेक्टर च्या पोशाखातील लहानसा, गोडसा ‘छोटा माही’…

आगरकोट किल्ला येथे ध्वजारोहण सोहळा उत्साहात संपन्न
रेवदंडा ग्रामपंचायत हद्दीतील ऐतिहासिक आगरकोट किल्ला येथे आज ध्वजारोहण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे ध्वजारोहण रेवदंडा ग्रामपंचायतीचे सरपंच प्रफुल्ल यशवंत मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रेवदंडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत किरवले हे आपल्या स्टाफसह उपस्थित होते. झेंड्याला सलामी देत मानवंदना अर्पण करण्यात आली. कार्यक्रमास ग्रामपंचायतीचे सदस्य राजेंद्र कुमार सदाशिव वाडकर,…

दहिसर दही हंडी दुर्घटना – आयोजक अध्यक्ष बाळू सुर्नारवर गुन्हा दाखल!
दहिसर दही हंडी दुर्घटना – आयोजक अध्यक्ष बाळू सुर्नारवर गुन्हा दाखल! ११ वर्षीय गविंदा महेश रमेश जाधवच्या मृत्यूच्या प्रकरणात दहिसर पोलिसांनी नवतरूण मित्र मंडळ पथकाचे अध्यक्ष बाळू सुर्नार यांच्यावर भारतीय न्याय संहिता कलम १०६ (दुर्लक्षामुळे मृत्यू) आणि कलम २३३ (सरकारी आदेश पाळण्यात नाकामी) अंतर्गत गंभीर गुन्हा दाखल केला आहे. सुरक्षा साधनांचा पूर्ण अभाव आणि नियमांची…