
Category: महाराष्ट्र

मुम्ब्रा दुर्घटना : संपादकीय
मुम्ब्रा दुर्घटना : जीवनदायिनीचे मृत्यूदान छावा • संपादकीय | दि. ११ जून २०२५ ९ जून २०२५ रोजी सकाळी मुम्ब्रा आणि दिवा स्थानकादरम्यान घडलेला लोकल रेल्वे अपघात केवळ एक दुर्दैवी घटना नव्हती, तर तो भारतातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या ढासळत्या स्थितीवर एक गंभीर सवाल उपस्थित करणारा टप्पा ठरला आहे. या अपघातात चार प्रवाशांचा मृत्यू झाला, तर अनेकजण…
१५वे विद्रोही साहित्य-संस्कृती संमेलन
२२ वर्षांनंतर पुन्हा एकदा साताऱ्याला यजमान क्रांतिसिंह नाना पाटील तथा प्रतिसरकारला समर्पण छावा • सातारा, दि.१० जून • प्रतिनिधी महाराष्ट्रातील सामाजिक, सांस्कृतिक आणि साहित्यिक क्षेत्रात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या विद्रोही साहित्य-संस्कृती चळवळीचे १५वे राज्यस्तरीय संमेलन यंदा सातारा येथे होणार आहे. संमेलनाची माहिती अध्यक्ष कॉ. धनाजी गुरव आणि सचिव डॉ. जालिंदर घिगे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली. यातील विशेष…

मोठी बातमी! मनोज जरांगेंचा बच्चू कडू यांच्या आंदोलनाला पाठिंबा, राज्य सरकारवर दबाव वाढला
छावा • मुंबई, दि. १० जून • विशेष प्रतिनिधी मराठा आरक्षणासाठी लढाद देणारे मनोज जरांगे यांनी बच्चू कडू यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. जरांगे बच्चू कडू यांची भेट घेणार आहेत. माजी मंत्री तथा प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांच्याकडून सध्या बेमुदत अन्नत्याग आंदोलन केले जात आहे. शेतकरी, कष्टकरी, कामगार, महिला यांच्या वेगवेगळ्या मागण्यांना घेऊन ते…
मुंबई लोकलसाठी स्वतंत्र महामंडळाची गरज
राज ठाकरे यांची भूमिका ♦ नागरी नियोजनावरही मनसे प्रमुखांकडून टीका • छावा • मुंबई, दि. १० जून • विशेष प्रतिनिधी मुंबईतील उपनगरीय रेल्वे सेवेसाठी एक स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. मुम्ब्रा येथील रेल्वे स्थानकावर झालेल्या भीषण अपघातानंतर ठाकरे यांनी मुंबईतील लोकल रेल्वे प्रणालीतील सुरक्षा आणि…
महाराष्ट्रात नव्याने ६५ कोविड-१९ रुग्णांची नोंद
यंदाचा वर्षातील एकूण रुग्णसंख्या १,५०४ वर • छावा • अलिबाग, दि. १० जून • विशेष प्रतिनिधी राज्यात सोमवारी(दि०९ जून) कोविड-१९ चे ६५ नवीन रुग्ण आढळून आले असून, यामुळे १ जानेवारी २०२५ पासूनची एकूण रुग्णसंख्या १,५०४ इतकी झाली आहे, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली. नवीन रुग्णांमध्ये सर्वाधिक २९ पुण्यात, २२ मुंबईत, पाच नागपूरमध्ये, चार कोल्हापुरात, दोन…
सिंधुदुर्गात अनोखी परंपरा
• कुडाळमध्ये पुरुषही करतात वटपौर्णिमेचे व्रत • पत्नीच्या दीर्घायुष्याची करतात प्रार्थना • छावा • कुडाळ(सिंधुदुर्ग), दि. १० जून • प्रतिनिधी वटपौर्णिमा हा सण पारंपरिकपणे महिलांचा मानला जात असला, तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ शहरात मागील १६ वर्षांपासून एक वेगळीच परंपरा जपली जात आहे. येथे पुरुषही संपूर्ण श्रद्धेने आणि विधीवत पद्धतीने वटपौर्णिमा साजरी करतात. या दिवशी…
‘सन्मान गमावून स्वार्थाचा विजय’
• संजय राऊत यांची तीव्र प्रतिक्रिया • चंद्रहार पाटील यांचा शिंदे गटात प्रवेश; ठाकरे गटातून संतापाची लाट • छावा • मुंबई, दि. १० • प्रतिनिधी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे सांगलीतील महत्त्वाचे नेते आणि कुस्ती क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व चंद्रहार पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना गटात प्रवेश केला. त्यांच्या या पक्षांतराने सांगलीतील राजकारणात…
कोकणातील बंदरविकासाच्या कामांना गती देण्याचे मत्स्यव्यवसाय मंत्र्यांचे निर्देश
• छावा • मुंबई, दि १० • प्रतिनिधी कारंजा, आनंदवाडी, मिरकरवाडा आणि ससून डॉक येथील बंदरांची विकासकामे गतीने आणि पारदर्शक पद्धतीने पूर्ण करण्याचे निर्देश मत्स्यव्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिले आहेत. मंत्रालयात पार पडलेल्या आढावा बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले. कोकणाच्या विकासासाठी ही बंदरे अत्यंत महत्त्वाची असून, या ठिकाणी चालू असलेल्या विकास प्रकल्पांमुळे…
पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांच्याकडून शहीद भगवान बिरसा मुंडा यांना अभिवादन
छावा • चंद्रपूर,दि. ९ जून | विशेष प्रतिनिधी शहीद दिनानिमित्त भगवान बिरसा मुंडा यांच्या पावन स्मृतीस राज्याचे आदिवासी विकास मंत्री आणि चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी अभिवादन करून त्यांना आदरांजली अर्पण केली. यावेळी त्यांनी बिरसा मुंडा यांच्या कार्यातून प्रेरणा घेण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमात आमदार किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी., मुख्य…
राज्यातील पहिली महसूल लोकअदालत पुणे जिल्ह्यात
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन छावा • पुणे, दि. ९ जून| प्रतिनिधी राज्यातील पहिली महसूल लोक अदालत पुणे जिल्ह्यात आयोजित करण्यात आली असून, याचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. या विशेष उपक्रमात महसूल विभागाच्या कार्यपद्धतीला नवसंजीवनी मिळणार असून, सामान्य नागरिकांच्या महसूलसंबंधित तक्रारींना जलद आणि न्याय्य तोडगा मिळणार असल्याचे उपमुख्यमंत्री पवार यांनी…