
ग्रामपंचायत डेटा ऑपरेटर: कमी मानधन, मोठी जबाबदारी – न्याय अजूनही दूर
छावा दि.१५ जुलै रेवदंडा (सचिन मयेकर) गावाच्या डिजिटल रूपांतरणात महत्त्वाची भूमिका बजावणारे ग्रामपंचायतीतील डेटा ऑपरेटर (Computer Operator / VLE) अत्यल्प मानधनात मोठ्या जबाबदाऱ्या पार पाडत आहेत. विविध शासकीय योजना, ऑनलाइन सेवा आणि ग्रामपंचायतीच्या रोजच्या प्रशासनासाठी या कर्मचाऱ्यांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. मात्र दुर्दैवाची गोष्ट अशी की, एवढं सगळं करूनही त्यांना आजतागायत ना निश्चित वेतन आहे,…