
अलिबाग-रेवदंडा रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य
चौल नाका, कुरुळ-नागाव परिसरात वाहतूक धोक्यात छावा दि. २१ जुलै रेवदंडा (सचिन मयेकर) अलिबाग ते रेवदंडा मार्गावरील रस्त्यांची अवस्था दिवसेंदिवस अधिकच खराब होत चालली आहे. या रस्त्यावर ठिकठिकाणी खोल खड्डे निर्माण झाले असून, या खड्ड्यांच्या साम्राज्यामुळे वाहनचालकांना वाहन चालवणे मोठ्या संकटाचे कारण ठरत आहे. खड्ड्यांमुळे गाड्या सतत आपटत असून वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे….