गणपतीच्या गर्दीचा चोरट्याने घेतला फायदा! पारनाक्यावर फळविक्रेत्या नुरजहान बुऱ्हाण यांचा मोबाईल लंपास

गणपती उत्सवानिमित्त रेवदंडा पारनाका येथे बाजारपेठेत मोठी गर्दी होत असते. याच गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने फळांची हातगाडी लावून उदरनिर्वाह करणाऱ्या नुरजहान बुऱ्हाण यांचा मोबाईल चोरून नेल्याची घटना घडली आहे.

छावा डिजिटल न्यूज मीडिया—सचिन मयेकर | सोमवार , दि. २१ सप्टेंबर २०२६

नुरजहान बुऱ्हाण या पारनाका येथे फिरती हातगाडी लावून फळांची विक्री करतात. त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नावर त्यांचा उदरनिर्वाह चालतो. गणपतीच्या सणानिमित्त पारनाका बाजारपेठेत नागरिकांची मोठी गर्दी झाली असताना त्या फळविक्री करत होत्या.

याच गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांचा मोबाईल लंपास केला. काही वेळाने मोबाईल चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे कष्ट करून उदरनिर्वाह करणाऱ्या नुरजहान बुऱ्हाण यांना मोठा आर्थिक फटका बसला हा मोबाईल त्यांनी पैशांच्या गल्ल्याजवळ ठेवलेला होता.

दरम्यान, नुरजहान बुऱ्हाण यांचा चोरीला गेलेला मोबाईल शोधून देत अज्ञात चोरट्यावर कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *