सिद्धू धमाका – जीवाशी खेळणाऱ्या निष्काळजीपणाला माफी नाही! – मनसे अलिबाग तालुका अध्यक्ष सिद्धू म्हात्रे

छावा न्यूज –२९ जून | सचिन मयेकर, अलिबाग 

अलिबाग येथील सिव्हिल रुग्णालयात रविवारी (दि. २८ जून) रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास इमारतीच्या स्लॅबचा काही भाग अचानक कोसळल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेची माहिती एका मित्राने दूरध्वनीद्वारे मनसेचे अलिबाग तालुका अध्यक्ष सिद्धू म्हात्रे यांना दिली. माहिती मिळताच सिद्धू म्हात्रे यांनी तत्काळ सिव्हिल रुग्णालयात धाव घेत घटनास्थळाची पाहणी केली. सुदैवाने, त्या वेळी संबंधित ठिकाणी कोणताही रुग्ण किंवा कर्मचारी उपस्थित नसल्यामुळे मोठी जीवितहानी टळली. मात्र, सार्वजनिक रुग्णालयातील इमारतींची अशी दयनीय अवस्था अत्यंत गंभीर असून रुग्णांच्या जीवाशी खेळणारी असल्याचा संताप सिद्धू म्हात्रे यांनी व्यक्त केला. घटनेनंतर त्यांनी संबंधित प्रशासनाकडे तातडीने संपूर्ण इमारतीची संरचनात्मक तपासणी करण्याची, दोषींवर कठोर कारवाई करण्याची आणि रुग्णालय परिसर सुरक्षित करण्याची मागणी केली. “जीवाशी खेळणाऱ्या निष्काळजीपणाला माफी नाही. सार्वजनिक रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येक रुग्णाच्या सुरक्षिततेची जबाबदारी प्रशासनाची आहे. अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात,” अशी तीव्र प्रतिक्रिया मनसे अलिबाग तालुका अध्यक्ष सिद्धू म्हात्रे यांनी दिली.

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *