कोकण विभागात रेवदंडा येथील MY ABACUS CLASSES च्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश; समर कॉम्पिटिशन २०२६ मध्ये २ विद्यार्थी मेरिट लिस्टमध्ये, ७ ट्रॉफी विजेते

छावा न्यूज –२७ जून | सचिन मयेकर, रेवदंडा 

दिनांक २४ जून २०२६ रोजी ठाणे येथे आयोजित करण्यात आलेल्या Proactive Abacus Summer Competition 2026 मध्ये रेवदंडा येथील MY ABACUS CLASSES च्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत कोकण विभागात संस्थेचे नाव उज्ज्वल केले.

या स्पर्धेत MY ABACUS CLASSES च्या १० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. त्यापैकी २ विद्यार्थ्यांनी मेरिट लिस्टमध्ये स्थान मिळविले, तर ७ विद्यार्थी ट्रॉफी होल्डर ठरले.

स्पर्धेचे स्वरूप ६ मिनिटांत गणिताची १०० उदाहरणे सोडविण्याचे होते. यामध्ये इयत्ता दुसरीचा विद्यार्थी आयांश बाजी याने अवघ्या ५ मिनिटे ४२ सेकंदांत १०० उदाहरणे सोडवत ९९ गुण मिळविले आणि आपल्या गटात तृतीय क्रमांक पटकावला. तसेच इयत्ता पाचवीचा विद्यार्थी रुद्र चुनेकर याने ८६ अचूक उदाहरणे सोडवून आपल्या गटात सहावा क्रमांक मिळविला.

स्पर्धेत ट्रॉफी मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये रिया जैस्वाल, साईशा गायकवाड, रिया वरसोलकर, श्रीशा पाटील, युगांती, यश वानखेडे आणि मेहरान कादीरी यांचा समावेश आहे.

या सर्व विद्यार्थ्यांना MY ABACUS CLASSES च्या संचालिका सौ. प्रिया गायकवाड यांचे उत्कृष्ट मार्गदर्शन लाभले. तसेच श्रीकृपा स्कूलच्या संचालिका रिया झावरे यांनीही विद्यार्थ्यांना मोलाचे सहकार्य केले.

विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल पालक, शिक्षक आणि रेवदंडा परिसरातून त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या भावी शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *