वाढदिवस आणि यशाचा दुहेरी आनंद हर्षद हिंगे साहेबांवर शुभेच्छांचा वर्षाव

छावा डिजिटल न्यूज पोर्टल | रायगड- सचिन मयेकर | दि. ०७ जून २०२६

आज वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव होत असलेले हर्षद दर्शना सुनिल हिंगे साहेब यांच्यावर सर्व स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. कर्तव्यनिष्ठ, धाडसी, प्रामाणिक आणि जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर असलेले अधिकारी म्हणून त्यांनी आपल्या कार्याची वेगळी ओळख निर्माण केली आहे. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच त्यांची असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर (API) पदावर पदोन्नती झाली असून त्यामुळे यंदाचा वाढदिवस त्यांच्यासाठी अधिकच खास ठरला आहे. स्वबळावर, अथक मेहनतीवर आणि प्रामाणिक सेवाभावावर मिळवलेले हे यश अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. काही वर्षांपूर्वी रेवदंडा पोलीस स्टेशन येथे पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत असताना हिंगे साहेबांनी आपल्या धडाकेबाज कार्यशैलीचा ठसा उमटवला होता. अन्यायाविरुद्ध कठोर भूमिका, गुन्हेगारीविरोधातील आक्रमक कारवाई आणि सामान्य नागरिकांशी आत्मीयतेने वागण्यामुळे त्यांनी लोकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले.

“सिंघम” शैलीचे अधिकारी म्हणून ओळख असलेल्या हिंगे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त मित्रपरिवार, सहकारी, पोलीस दलातील अधिकारी-कर्मचारी आणि नागरिकांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

🚩 शिवरायांच्या चरणी प्रार्थना… 🚩

हर्षद हिंगे साहेबांना निरोगी, आनंदी, यशस्वी आणि दीर्घायुषी जीवन लाभो. त्यांच्या कार्याचा गौरव दिवसेंदिवस वाढत राहो, हीच सदिच्छा.

 “सद्रक्षणाय खलनिग्रहणाय” 

(सज्जनांचे रक्षण आणि दुर्जनांचा नाश.

💐 छावा परिवारातर्फे हर्षद हिंगे साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 💐

 

🚩 जय शिवराय! जय महाराष्ट्र! 🚩

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *