लग्नाचे आमिष, प्रेमाचे नाटक अन् वारंवार अत्याचार; महाडमध्ये तरुणाविरोधात बलात्काराचा गुन्हा

छावा डिजिटल न्यूज पोर्टल | सचिन मयेकर | दि. ३१ मे २०२६

महाड तालुक्यातील तुडील परिसरात एक धक्कादायक प्रकार समोर आला असून, लग्नाचे आमिष दाखवत २५ वर्षीय तरुणीशी वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याप्रकरणी ३२ वर्षीय तरुणाविरोधात महाड तालुका पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डिसेंबर २०२५ ते १२ मे २०२६ या कालावधीत आरोपी शहाजेब मुसा जुवेल (वय ३२, रा. अप्पर तुडील, ता. महाड) याने फिर्यादी तरुणीशी प्रेमसंबंध असल्याचे भासवत तिच्याशी लग्न करण्याचे आश्वासन दिले. या आश्वासनावर विश्वास ठेवण्यास भाग पाडून तिची फसवणूक करत तिच्यासोबत वारंवार शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादीच्या माहेरी असलेल्या घराच्या टेरेसवर अनेक वेळा हा प्रकार घडला. तसेच घडलेली बाब कोणालाही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचाही गंभीर आरोप करण्यात आला आहे. पीडित महिलेने अखेर धाडस दाखवत पोलिसांत धाव घेतल्यानंतर ३० मे २०२६ रोजी महाड तालुका पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील कलम ६४(२)(एम), ६९, ३५१(२) तसेच भारतीय दंड संहिता (IPC) १८६० मधील कलम ३७६(२)(एन), ३७६(क) आणि ५०६ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास महाड तालुका पोलीस करत असून, आरोपीविरोधात कठोर कारवाईची मागणी परिसरातून व्यक्त होत आहे.

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *