दिलीप भोईर उर्फ छोटमशेठ यांच्या पुढाकारातून करिअर मार्गदर्शन शिबिराला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

छावा डिजिटल न्यूज पोर्टल |अलिबाग- राजेश बाष्टे – दि. 3१ मे २०२६

अलिबाग शहरात करिअरची दिशा मिळाली, 10वी-12वी च्या विद्यार्थ्यांना भविष्याचा रोडमॅप विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी धावणारा हात म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रायगड जिल्हा परिषद सदस्य तथा माजी समाजकल्याण सभापती *श्री. दिलीप भोईर उर्फ छोटमशेठ* यांच्या पुढाकारातून अलिबाग शहरात भव्य करिअर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला विद्यार्थी आणि पालकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला.  शिबिराचे उद्घाटन अलिबाग नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष तथा वीज व बांधकाम सभापती *मा. श्री. प्रशांतशेठ नाईक* यांच्या हस्ते संपन्न झाले. त्यांच्या मार्गदर्शनपर शब्दांनी विद्यार्थ्यांमध्ये नवीन ऊर्जा संचारली.  यावेळी शिवसेना अलिबाग शहरप्रमुख *श्री. विकास कर्णेकर* यांच्यासह शिवसेना अलिबाग शहरातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक मान्यवर शिक्षक शिकक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण सभागृह खचाखच भरले होते.   इयत्ता 10वी व 12वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना विविध करिअर संधी, व्यावसायिक अभ्यासक्रम, स्पर्धा परीक्षा, कौशल्याधारित शिक्षण आणि उच्च शिक्षणाबाबत तज्ज्ञांनी सखोल मार्गदर्शन केले. विज्ञान, वाणिज्य, कला शाखेनंतर काय? इंजिनिअरिंग, मेडिकल, CA, डिफेन्स, हॉटेल मॅनेजमेंट यांसारख्या क्षेत्रांची माहिती विद्यार्थ्यांना मिळाली.  फोटोंमध्ये दिसतेय, सभागृहात विद्यार्थी-विद्यार्थिनी अगदी शेवटच्या बाकापर्यंत बसून तल्लीनतेने मार्गदर्शन ऐकत होते. मुलींचा सहभाग लक्षणीय होता. प्रश्नोत्तर सत्रात विद्यार्थ्यांनी मनमोकळेपणाने शंका विचारल्या. कार्यक्रमात मान्यवरांचा पुष्पगुच्छ, शाल-श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. तज्ज्ञ मार्गदर्शकांचा स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. 10वी-12वी नंतरचा निर्णय विद्यार्थ्यांचे आयुष्य घडवतो. योग्य मार्गदर्शन मिळाले नाही तर हुशार मुलंही भरकटतात. म्हणूनच हा उपक्रम. अलिबागच्या मुलांनी मोठं स्वप्न पाहावं आणि ते पूर्ण करावं, यासाठी आम्ही सदैव सोबत आहोत. असे शिबिर कॉलेजमध्ये होत नाहीत. आता नेमकं काय करायचं हे कळलं. छोटमशेठ आणि प्रशांतशेठ नाईक यांचे आभार” – एका विद्यार्थिनीने आनंद व्यक्त केला. शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातून या उपक्रमाचे भरभरून कौतुक होत आहे. ‘मार्गदर्शन म्हणजे खरी समाजसेवा’ अशी चर्चा आहे.   नुसत्या भाषणांपेक्षा कृती महत्त्वाची. दिलीप भोईर छोटमशेठ यांनी ती करून दाखवली. अलिबागच्या विद्यार्थ्यांना घडवायचं असेल तर असेच उपक्रम हवेत. *शिक्षण हाच खरा वारसा.

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *